पोलिसांनी जखमी अवस्थेतही चौघांना पाठलाग करून पकडलेच...

पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पोलिसांवर सत्तूरने हल्ला करीत दगडफेक केली.

नगरः नगर जिल्ह्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच या टोळीने हल्ला केला. यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्य़ासह एक ग्रामस्थ जखमी झाल्याची घटना बोटा गावांतर्गत असलेल्या माळवाडी येथे बुधवारी (ता. 21) पहाटे घडली. पोलिसांनी चार दरोडेखोरांना अटक केली असून, एकजण फरार झाला आहे.

एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केला राज कुंद्रावर गंभीर आरोप

पोलिस नाईक गणेश लोंढे यांच्यासह एक ग्रामस्थ जखमी झाला आहे. जानकू लिंबाजी दुधवडे (वय 22), संजय निवृत्ती दुधवडे (दोघेही रा. गाढवलोळी, अकलापूर, ता. संगमनेर), दत्तू बुधा केदार (वय 19, रा. नांदुर खंदरमाळ, ता. संगमनेर), राजू सुरेश खंडागळे (वय 25, रा. माळवाडी बोटा, ता. संगमनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, भाऊ लिंबा दुधवडे (वय 25, रा. गाढवलोळी, अकलापूर) हा फरार झाला आहे.

चाकण येथील ATM चोरीचे CCTV फुटेज आले समोर...

घारगावचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजय विखे, पोलिस नाईक गणेश लोंढे, राजेंद्र लांघे, कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे, किशोर लाड, प्रमोद चव्हाण, गणेश तळपाडे, चालक संतोष फड हे बोटा परिसरातील माळवाडी येथे गस्त घालत होते. यावेळी दोन दुचाकींवर पाचजण संशयितरीत्या फिरताना आढळले. पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पोलिसांवर सत्तूरने हल्ला करीत दगडफेक केली. यामध्ये पोलिस नाईक गणेश लोंढे यांच्या गुडघ्याला व हाताला मार लागला असून, एक ग्रामस्थही जखमी झाला आहे. यानंतरही पोलिसांनी चौघांना पाठलाग करून पकडले.

पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची मोठी कारवाई...

याप्रकरणी पोलिस नाईक गणेश लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी वरील पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक धीरज राऊत पुढील तपास करीत आहेत.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: nagar crime news injured police four arrested at ghargaon po
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे