घराच्या गच्चीवर झोपलेल्या महिलेच्या खून

मंगळवेढा शहरानजीक अकोला रोडवर आईसोबत राहणाऱ्या मंगल कुबेर नरळे या महिलेचा घराच्या गच्चीवर डोक्यात दगड घालून अज्ञात व्यक्तीने निर्घृण खून केल्याची घटना बुधवार ९ जून २०२१ रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली.

सोलापूर: मंगळवेढा शहरानजीक अकोला रोडवर आईसोबत राहणाऱ्या मंगल कुबेर नरळे ( वय ३५) या महिलेचा घराच्या गच्चीवर डोक्यात दगड घालून अज्ञात व्यक्तीने निर्घृण खून केल्याची घटना बुधवार ९ जून २०२१ रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली.

पोलिसांमुळे अपहरण केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत...

शहरापासून २ किलोमीटर अंतरावर असणारे अकोला रोडवर असणाऱ्या आपल्या घरात फिर्यादी चंदाबाई कुबेर नरळे ( वय ५५) व त्यांची मयत मुलगी मंगल कुबेर नरळे या दोघी मिळून घराच्या गच्चीवर झोपल्या होत्या.

धक्कादायक! मालेगावात अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन हत्या...

 अचानक आई चंदाबाई यांच्या पोटात कळ मारू लागल्याने त्या खाली शौचास आल्या. मुलगी मंगल गच्चीवर एकट्या झोपल्या होत्या, तेव्हा आई शौचालयात असताना त्यांना कशाचा तरी आवाज आल्याने त्या गच्चीवर गेल्या त्या वेळेला मुलगी मंगल हिचा अज्ञात कारणावरून तिच्या डोक्यात दगड घालून अज्ञात इसमाने खून केल्याचे निदर्शनास आले.

मेव्हणीच्या प्रेमसंबंधाबाबत समजल्यावर दाजीने उचलले मोठे पाऊल...

आई चंदाबाई नरळे यांनी याबाबत फिर्याद दिली असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .सदर गुन्ह्याचा तपास सपोनि भगवान बुरसे करीत आहेत.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: Murder of a woman sleeping on the terrace of the house
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे