मुंबई बलात्कार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश...

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून, पोलिस आयुक्तांशी सुद्धा बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे.

मुंबई : साकीनाका परिसरात महिलेवर बलात्का होऊन नंतर तिचा मृत्यू होणे हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून, गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) दिली आहे.

मुंबई बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी...

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून, पोलिस आयुक्तांशी सुद्धा बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

मुंबईतील बलात्काराच्या तपासादरम्यान समोर आली धक्कादायक माहिती...

गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले की, 'साकीनाका येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे. यामध्ये जो कुणी सहभागी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. मुख्य आरोपी पकडला असून, त्याच्या कडून माहिती काढून घेऊन त्याच्यावर ही कठोर कारवाई केली जाईल. महिलांच्या बाबतीत लवकरच शक्ती ऍक्ट तयार करण्यात येईल, त्याची प्रोसेस सुरू आहे.'

संतापजनक! बलात्कार करून महिलेच्या गुप्तांगात टाकला रॉड...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'साकीनाका येथे घडलेला एकूण प्रकार आणि त्यानंतर त्या निर्भयाचा मृत्यू हा मन सुन्न करणारा आहे. गेल्या महिन्याभरात ज्या प्रकारे बलात्काराच्या घटना होत आहेत, कुठेतरी याकडे लक्ष घालण्याच्या आवश्यकता आहे. साकीनाका येथील प्रकरण, अमरावतीत 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, पुण्यात तीन घटना घडल्या आहेत. पालघरमध्ये घटना घडल्या आहेत अतिशय भयानक अशा या घटना आहेत. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. सुरक्षित शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबईत महिला, मुलींना रात्री फिरण्या करता कधी अडचण येत नाही पण अशा प्रकारच्या घटना घडल्या जर घडल्या तर एकप्रकारे मुंबईच्या लौकिकाला धक्का पोहोचतो.'

माणूसकीला काळीमा! चिमुकलीवर बलात्कार करून काढले डोळे...

दरम्यान, मुंबईतील अंधेरी परिसरातील साकीनाका येथे बलात्कार झालेल्या त्या पीडित महिलेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. पीडित महिलेचा उपचारा दरम्यान आज (शनिवार) मृत्यू झाला आहे. बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यामुळे आता आरोपीविरोधात खूनाच्या गुन्ह्याचीही नोंद केली जाणार आहे. पीडित महिलेला मारहाण करुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला होता. शिवाय, महिलेच्या गुप्तांगात रॉड टाकून गंभीर दुखापत केली होती.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: mumbai sakinaka case cm uddhav thackeray fast track court an
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे