पंतप्रधानांना ठार मारणारा धमकीचा मेसेज; क्लिपमध्ये म्हटले की...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीव मारण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे पाठवण्यात आला आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीव मारण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे.

मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या क्रमांकावर आज (मंगळवार) सकाळी एक व्हॉटसअप मेसेज आला. या मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे ठार मारण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. या मेसेजमुळे एकच खळबळ उडाली. याबद्दल तातडीने वाहतूक शाखेने वरिष्ठ पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. वरळी पोलिस स्टेशनमध्ये याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली असून, मेसेज कुणी पाठवला, याचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, मुंबई पोलिसच्या ट्रॅफिक कंट्रोल मोबाईल क्रमांकावर हा धमकीचा मेसेज आला. यावेळी कंट्रोल नंबरवर अनेक ऑडिओ क्लिपसही आल्या आहेत. त्यापैकी एका क्लिपमध्ये मोदी यांना ठार मारण्याचा दावा केला आहे. "अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे गुंड देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार आहेत” आणि देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे या ऑडीओ क्लिपमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, 20 नोव्हेंबर रोजी ट्रॅफिक कंट्रोलच्या क्रमांकावर 7 ऑडिओ क्लिप आणि 11 मेसेज प्राप्त झाल्याची माहिती आहे. आणि 21 तारखेला 12 ऑडिओ आणि 9 मेसेजेस प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या व्यक्तीपर्यंत पोलिस पोहोचले आहे. तपासात आढळून आले की, मेसेज करणारा व्यक्ती पूर्वी एका डायमंड कंपनीत दागिने घडवणारा कारागीर होता. परंतु मानसिक आजारामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल्यामुळे तो एक वर्षांपासून बेरोजगार आहे. त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. ही व्यक्त केरळमध्ये असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट; बेड्या ठोकल्यावर सांगितले कारण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी देणारा ईमेल...

पोलिसांना म्हणाला; मोदींना मारून मला पुन्हा कारागृहात जायचेय...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: mumbai police received a message threatening to kill pm modi
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे