मुंबईतील अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांचा मोठा निर्णय...

मुंबईत प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये वुमन सेफ्टी सेल स्थापणार!

मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलिसांना अतिदक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.

मुंबई : महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचारांच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबईमध्ये आता प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये वुमन सेफ्टी सेलची स्थापना केली जाणार आहे. तसेच, निर्भया पथक उपक्रम सुरू केले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महिला सुरक्षा तसेच महिला अत्याचार प्रतिबंधक उपाययोजना, महिला विषयक गुन्हे, बाल अत्याचार प्रतिबंधक यांच्या अनुषंगाने तपास आणि कार्यवाहीबाबत राज्यातील सर्व जिल्हे, आयुक्तालयनिहाय आढावा घेतला. या बैठकीनंतर मुंबई पोलिसांनी एक नवे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणी पोलिस आयुक्तांकडून महत्त्वाची माहिती...

मुंबईत निर्भया पथक आणि सक्षम हे उपक्रम सुरू केले जाणार आहे. शिवाय, प्रत्येक पोलिस ठाण्यात वुमन सेफ्टी सेलची स्थापना केली जाणार आहे. मोबाईल 5 या वाहनांला यापुढे निर्भया पथक संबोधित केले जाईल. प्रत्येक प्रादेशिक विभागाला 1 महिला सहाय्यक पोलिस आयुक्त आणि महिला पोलिस निरीक्षक असणार आहे निर्भया पोलिसांची वेगळी नोंदवही असावी अशी सूचनाही करण्यात आली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याने त्याच्या हद्दीतील महिला विरूद्ध होणारे गुन्ह्याच्या जागा शोधून काढाव्या, असे आदेशही देण्यात आले आहे.

मुंबई बलात्कार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश...

मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलिसांना अतिदक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.
- साकीनाका येथील घटनेच्या वेळी पोलिसांचा प्रतिसाद १० मिनिटाचा होता. अशा घटनामध्ये नियंत्रण कक्षाची भूमिका अत्यंत महत्वाची असून कोणत्याही कॉल विशेष करून महिलांसंदर्भात कॉलकडे दुर्लक्ष करू नये व त्याची तात्काळ योग्य ती निर्गती करावी. नियंत्रण कक्ष प्रभारी अधिकारी यांनी यावर सतत लक्ष ठेवावे.

- पोलिस ठाणे हद्दीतील अंधाराची ठिकाणे, निर्जन ठिकाणांचा आढावा घेवुन त्या ठिकाणी बीट मार्शल, पेट्रोलिंग मोबाईल वाहने यांची जास्तीत जास्त गस्त ठेवावी.

- अंधाराच्या व निर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्याकरीता महानगर पालिकेशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करावा तसेच अशा ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याकरीता संबंधीताकडे प्रस्ताव सादर करून याबाबत पाठपुरावा करावा.

- निर्जन स्थळी, अंधाराच्या ठिकाणी क्यूआर कोड लावावेत, जेणेकरुन अनुचित प्रकार टाळता येईल व त्यास प्रतिबंध करता येईल

- पोलिस ठाणे हददीत ज्या ठिकाणी सार्वजनिक महिला प्रसाधनगृहे आहेत, त्या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत पुरेशी लाईट व्यवस्था करून घ्यावी तसेच त्या ठिकाणी मोबाईल क्रमांक ५ गस्त ठेवावी

मुंबई बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी...

- गस्ती दरम्यान पोलिसांनी संशयीत व्यक्ती आढलळी तर त्याची चौकशी करावी तसच गरज वाटल्यास कारवाई करावी

- रात्री गस्ती दरम्यान एखादी महिला एकटी आढळून आल्यास महिला पोलिस अधिकारी/ अंमलदारांमार्फत विचारपूस करून त्यांना तात्काळ योज्य ती मदत देण्यात यावी. गरज भासल्यास सदर महिलेस सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी.

- पोलिस ठाणे हददीतील अंमली पदार्थांची नशा करणारे व अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमांवर योग्यती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी.

- पोलिस ठाणे हददीत रस्त्यावर बेवारसरित्या बऱ्याच काळापासून उभ्या असलेल्या टेम्पो, टॅक्सी, टूक व गाड्याच्या मालकांचा शोध घेवून वाहने त्यांना तेथून काढण्यास सांगणे अन्यथा अशी बेवारस वाहने ताब्यात घेवून पुढील कारवाई करावी.

मुंबईतील बलात्काराच्या तपासादरम्यान समोर आली धक्कादायक माहिती...

- महिलांसंबंधीत गुन्ह्यात कलम ३५४, ३६३, ३७६, ५०९ भादवि व पोस्को कायद्याअंतर्गत अटक आरोपींचा स्वतंत्र अभिलेख तयार करण्यात यावा. सर्व आरोपींवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी.

- ज्या पोलिस ठाणेच्या हद्दीत रेल्वे स्थानके आहेत व बाहेरून येणाऱ्या लांब पल्याच्या गाडया थांबतात अशा सर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोलिस बंदोबस्ताकरीता एक मोबाईल वाहन रात्री १० वा ते सकाळी ७०० वाजेपर्यंत तैनात करण्यात यावी.

- मोबाईल वरील कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांनी एकट्या येणाऱ्या महिलांची विचारपूस करावी. तसंच त्यांना योग्य ती मदत करून त्यांना इच्छित स्थळी पोहचण्याकरीता वाहनांची गरज असल्यास वाहन उपलब्ध करून त्या वाहनांचा कमांक, वाहनावरील चालकाचा मोबाईल कमांक नोंद करून घेतील. संबंधीतांनी नमूद एकटया महिलेस विहित स्थळी सुरक्षित पोहचविले आहे किंवा कसे, याबाबत खात्री करावी.

संतापजनक! बलात्कार करून महिलेच्या गुप्तांगात टाकला रॉड...

- ज्या पोलिस ठाणे हददीत रेल्वे स्थानके आहेत अशा पोलिस ठाणेतील रात्रौ गस्तीवरील अधिकार्‍यांनी रेल्वे स्थानका बाहेर भेटी दयाव्यात व तेथे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. उपरोक्त सुचनांची सर्व संबंधीतांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. त्यात कोणीही दुर्लक्ष करणार नाही याची दक्षता घ्यावी.

माणूसकीला काळीमा! चिमुकलीवर बलात्कार करून काढले डोळे...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: mumbai police news women safety cell will be set up in every
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे