मुंबईत महिला पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू; सेल्फी ठरला अखेरचा...

पोलिस हवालदार कांचन प्रमोद भिसे (वय ४६) या रविवारी चक्कर येऊन कोसळल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: इंडियन हेरिटेज सोसायटी यांच्या वतीने आयोजित मुंबई संस्कृती फेस्टिव्हल २०२३ येथे बंदोबस्तासाठी असताना पोलिस हवालदार कांचन प्रमोद भिसे (वय ४६) या रविवारी चक्कर येऊन कोसळल्या होत्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

कांचन भिसे यांना रक्ताच्या उलट्या झाल्याने त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचादरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला. सकाळी मॅरेथॉनच्या बंदोबस्तावर असताना त्यांनी मुंबई मॅरेथॉनचा आंतरराष्ट्रीय ॲम्बेसिडर आणि जमैकाचा ऑलिम्पिक सुवर्ण विजेता धावपटू योहान ब्लेक याच्यासोबत घेतलेला त्यांचा सेल्फी अखेरचा ठरला आहे.

भिसे या विशेष शाखांमध्ये कार्यरत होत्या. रविवारी रात्री ८ च्या सुमारास एमआरए मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या फेस्टिव्हलला बंदोबस्तासाठी तैनात होत्या. त्याच, दरम्यान अचानक चक्कर येऊन खाली पडल्या आणि त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. सहकाऱ्यांनी त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले. मात्र, उपचारांना प्रतिसाद न दिल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

दरम्यान, सकाळी त्या मुंबई मॅरेथॉनच्या बंदोबस्तासाठीही तैनात होत्या. सकाळी त्यांनी योहान ब्लेकसोबत फोटो काढून स्टेट्सलाही ठेवला होता. त्यांच्या मृत्यूनंतर तो फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या मृत्यूने कुटुंबीयांसह पोलिस दलाला धक्का बसला आहे.

हृदयद्रावक! महिला पोलिसाच्या डोक्यात बैलाचे शिंग घुसल्याने दुर्देवी मृत्यू

धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलिस निरीक्षकाची आत्महत्या...

पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या...

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिसकाकाचा मृत्यू...

हृदयद्रावक! दहा दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिलेल्या महिला पोलिसाचा मृत्यू...

वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन...

हृदयद्रावक! महिला पोलिस मुलाला उपचारासाठी घेऊन जात असतानाच...

पुणे शहरातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसकाका भास्कर मोढवे यांचे हृदयविकाराने निधन

पोलिसकाका सुनील जंगम यांच्या निधनाने बसला धक्का...

पुणे जिल्ह्यात पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप...

नागपूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कारण समोर...

सांगलीत पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या

इमारतीवरून तोल गेल्याने पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू तर...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा 

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: mumbai police news women police kanchan bhise passes away a
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे