मुंबई पोलिसांची 'बोल बच्चन' गँगवर धडाकेबाज कारवाई...

संबंधित प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल मार्फत सुरु होता. तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिसांना या गँगच्या प्रमुख आरोपीचा सुगावा लागला.

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बोल बच्चन गँगवर धडाकेबाज कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी गर्दीचा फायदा घेऊन आणि समोरच्या व्यक्तीला आपली ओळख दाखवून बोल बच्चन करून फसविण्याचे काम करत होते. हे आरोपी ओळख नसताना ओळखीचे असल्याचे भासवायचे आणि चोरी करायचे.

भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्तानमध्ये हत्या

चेंबूर पोलिस स्टेशनमध्ये 26 मार्च 2021 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता. आरोपींनी आपली ओळख सांगून तक्रारदाराला बोलण्यात गुंतवले. त्यानंतर आरोपी संधी मिळताच तक्रारदाराचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाले. हे आरोपी दुसऱ्याच्या नावावर सीमकार्ड घेऊन लोकांसोबत बोलायचे. त्यामुळे त्यांना पकडून कारवाई करणे पोलिस अधिकाऱ्यांना कठीण जात होते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचा मोठा दणका...

संबंधित प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल मार्फत सुरु होता. तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिसांना या गँगच्या प्रमुख आरोपीचा सुगावा लागला. पोलिसांनी मोबाईल नंबर ट्रेसकडून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. संबंधित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, दिवा शीळफाटा, कल्याण डोंबिवली या भागात लपून बसला होता. अखेर पोलिसांनी त्याला दिवा पूर्वेतून अटक केली.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: Mumbai Police arrest two people of bol bachchan gang
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे