नारायण राणे यांना मोठा दणका; दंड शिवाय बंगल्यावर हातोडा...

अधिश बंगला बांधकाम प्रकरणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.

मुंबई : अधिश बंगला बांधकाम प्रकरणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. बंगल्याबाबत याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, मुंबई महापालिकेला कारवाई करण्यास परवानगीही दिली आहे.

नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथे Adhish नावाचा बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई पालिकेने दोन वेळा राणे यांच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यानंतर नारायण राणे यांच्या बंगल्याला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली होती. नारायण राणे यांनी या नोटीशीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने राणेंची याचिका निकाली काढली आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) अंतिम निर्णय दिला आहे. बांधकाम नियमीत करण्याची त्यांची याचिका नाकारली आहे. १० लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, महापालिकेला अवैध बांधकाम तोडण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती वकीलांनी दिली.

तक्रारकर्ते संतोष दौंडकर यांनी न्यायालयाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला. 'आज सर्वसामान्यांना न्याय मिळाला आहे. नारायण राणे यांनी केलेले अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश न्यायालयाने बीएमसीला दिले आहे. मी २०१६ पासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. एक चांगला आदर्श आजच्या निकालाने मिळाला आहे. त्यामुळे बीएमसीने आता कारवाई करावी' असे दौंडकर यांनी म्हटले आहे.

नारायण राणेंच्या अडचणीत आणखी वाढ; पोलिसांची नोटीस...

पोलिसांसोबत हुज्जत घालणे माजी खासदार नीलेश राणे यांना पडले महागात....

नारायण राणे यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात लूक आऊट नोटीस जारी...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: mumbai high court fined 10 lakhs to narayan rane in adhish b
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे