महिलेला बँकेचे नोडल अधिकारी असल्याचे सांगणारे दोघे अटकेत...

मोबाईलवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा असा मेसेज पाठवला होता.

मुंबई : मुंबईतील एका महिलेला दोन युवकांनी डिसेंबर 2022 मध्ये लाखो रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला होता. महिलेने तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांनी मुंगेर जिल्ह्यातून सायबर गुन्ह्यातील दोन युवकांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

बँकेचे अधिकारी असल्याचे सांगत दोघांनी महिलेच्या बँक खात्यातून 2,70,990 रुपये गायब केले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने पोलिस ठाणे गाठत या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. अखेर पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. आरोपी मुंगेर जिल्ह्यातील परसंडो गावातील रहिवासी आहेत. 

राजन आणि किशोर उर्फ अभिनव अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. ते मुंगेर जिल्ह्यातील हवेली खडगपूर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या पससंडो गावातील रहिवासी आहेत. त्यांनी मुंबईची रहिवासी असलेल्या एका महिलेला एक संदेश पाठवला. ज्यामध्ये आपण बँकेचे नोडल अधिकारी असून, तुम्हाला दोन हजार रुपयांची लॉटरी लागली आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा असा मेसेज पाठवला होता. या महिलेने लिंकवर क्लिक करताच तिच्या अकाऊंटमध्ये असलेली सर्व रक्कम आरोपीच्या खात्यावर ट्रान्सफर झाली होती.

महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने पोलिस ठाणे गाठत आपली तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीच्या आधारे संबंधित आरोपींविरोधात आयपीसी कलम 420 आणि आयटी अॅक्ट 66 सीडी अंतर्गत गु्न्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मुंगेर गाठत तेथील पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींना मुंबईत आणण्यात आले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक...

पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...

'पोलिसकाका विशेषांक'

किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

वेबसाईटवरून ओळख; लॉजवर नेऊन बलात्कार अन् ऑनलाइन फसवणूक...

शिवाजीनगर पोलिसांनी महिलांसोबत अश्लिल बोलणाऱयाला दिल्लीतून केली अटक...

विद्यमान आमदार ठरले 'सेक्सटॉर्शन' गुन्हेगारीची शिकार...​

धक्कादायक! पुण्यातील आजोबांची डेटिंग ऍपच्या माध्यमातून कोट्यवधींची फसवणूक अन्...​

'सेक्सटॉर्शन'च्या त्रासाला कंटाळून आत्महत्या; पुणे पोलिसांची मोठी कारवाई...

महिला व्हिडिओ कॉलवर झाली नग्न आणि पुढे घडलं भयानक...

ऑनलाईन सेक्सटॉर्शन! पुणे पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन आवळल्या आरोपीच्या मुसक्या...

पुण्यात 'सेक्स तंत्र' कोर्सची जाहिरात व्हायरल; पोलिसांकडून शोध सुरू...

स्वारगेट पोलिसांनी 'यु ट्यूब'वरील बंटी-बबलीला गुजरातमधून केली अटक...

हॅलो, कॅनरा बँकेतून अमित मिश्रा बोलतोय असं म्हणाला अन्...

सावधान! पुणे ग्रामीण पोलिसांचा महत्वाचा संदेश...

बोगस वेबसाईट तयार करून अनेकांना गंडा घालणाऱया गँगचा पर्दाफाश...

Video: राज्यात ऑनलाइन फसवणुकीच्या प्रमाणात वाढः देवेंद्र फडणवीस

मोबाईलवर आलेल्या लिंकवर केले क्लिक अन् रक्कम झाली गायब...

वृद्धाच्या मोबाईलवर अनोळखी न्यूड व्हिडीओ कॉल आला अन्...

आमदार माधुरी मिसाळ यांची ऑनलाईन फसवणूक; बंटी आणि बबली ताब्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: mumbai cyber crime news two arrest for women bank amount tra
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे