साकीनाका बलात्कार प्रकरणी पोलिस आयुक्तांकडून महत्त्वाची माहिती...

साकीनाका बलात्कार प्रकरणी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली.

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली. पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाचा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला असून, पीडित महिलेच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहायता निधीतून तसेच शासनाच्या विविध योजनांमधून 20 लाखांची मदत केली जाणार असल्याची माहिती श्री. नगराळे यांनी दिली.

मुंबई बलात्कार प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश...

पोलिस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले, 'पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाचा एससी एसटी अ‍ॅक्ट या गुन्ह्याला लावलेला आहे. त्याअनुषंगाने तपास सुरु आहे. आरोपीला अटक केली असून, 21 तारखेपर्यंत पोलिस कोठडी आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून, त्याने सर्व घटनेची माहिती दिली आहे.'

मुंबई बलात्कार प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी...

'घटनास्थळावर पीडित महिला कधी आली, आरोपी कधी आला, गुन्हा कसा घडला, त्यानंतर आरोपी कसा पळून गेला, या सगळ्याची पुराव्यासकट माहिती मिळाली आहे. आरोपीकडे असणारे प्रमुख हत्यारंही जप्त केले आहे. या संवेदनशील गुन्ह्यासाठी विशेष वकील राजा ठाकरे यांची नेमणूक केली आहे. ते आपल्याला तपासात मार्गदर्शन करत आहेत,' असेही श्री. नगराळे यांनी सांगितले.

मुंबईतील बलात्काराच्या तपासादरम्यान समोर आली धक्कादायक माहिती...

'मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय मदत योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांमधून आणि मुख्यमंत्री साहायता निधीतून पीडित महिलेच्या मुलींना 20 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. पीडितेला तीन मुली आहेत. त्याचबरोबर इतर शासकीय योजनांतून जेवढी मदत देता येईल तेवढी मदत केली जाईल,' असेही मुंबई पोलिस आयुक्तांनी सांगितले.

संतापजनक! बलात्कार करून महिलेच्या गुप्तांगात टाकला रॉड...

दरम्यान, सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, महिला बाल कल्याण विभागाच्या सचिव आय. एस. कुंदन, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मिलिंद भारंबे उपस्थिती होते.

माणूसकीला काळीमा! चिमुकलीवर बलात्कार करून काढले डोळे...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: mumbai crime news sakinaka women case and cp hemant nagrale
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे