मृतदेहाचे विचित्र तुकडे; पण हातावर रवींद्र आणि हनुमानाचे चित्र...

पोलिसांना मृतदेहाचे विचित्र तुकडे आढळून आले होते. शीर, धड आणि हात पाय हे अगदी क्रूरतेने कापून पुरावा नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते.

नवी मुंबई : नवी मुंबईत एपीएमसी मार्केट परिसरात असलेल्या माथाडी चौकाजवळ कोपरीगावाकडे जाणाऱ्या गटारात निळ्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पुरुष मृतदेहाचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन दिवसातच सुमित कुमार चव्हाण नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेत, गुन्ह्याचा तपास उघड केला आहे.

धक्कादायक! पत्नीच्या प्रेमसंबंधाच्या संशयाने घात केला...

पोलिसांना मृतदेहाचे विचित्र तुकडे आढळून आले होते. शीर, धड आणि हात पाय हे अगदी क्रूरतेने कापून पुरावा नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे आणि आरोपीला अटक करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पण, हातावर रवींद्र आणि हनुमानाचे चित्र असलेल्या टॅटूवरून पोलिसांनी शोध लावला. नवी मुंबई पोलिस एसीपी विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील 100 हुन अधिक मिसिंग तक्रारी लक्षात घेऊन मयताच्या वर्णनाशी मिळती जुळती व्यक्ती कोपरखैरणे परिसरातून मिसिंग असल्याचे आढळून आले. यावर परिसरातील सीसीटीव्हीची बारकाईने पाहणी करुन सुमितकुमार हरिशकुमार चव्हाण याला अटक केली. दोघे मित्र होते. पण, आर्थिक देवाण-घेवाण आणि जुन्या भांडणातून आरोपीने मयताचा दारु पाजून खून केल्याचे उघड झाले.

पोलिस अधिकारी पल्लवी जाधव लवकरच नव्या भूमिकेत...

उजवा आणि डावा हात कोपरापासून तोडलेल्या स्थितीत, उजवा आणि डावा पाय गुडघ्यापासून तोडलेल्या स्थितीत, उजव्या आणि डाव्या मांडीचे दोन तुकडे आणि डाव्या पायात काळ्या रंगाचा धागा बांधलेला होता. मृतदेहाचे बारीक-बारीक तुकडे केल्याने मृतदेहाची ओळख पटणे अवघड जात होते. पण, एपीएमसी पोलिसांनी केवळ दोन दिवसात हे काम केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

हृदयद्रावक! माय-लेकराचा मृत्यूने दु:खाचा डोंगर...

पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंह, पोलिस सह आयुक्त डॉ. जय जाधव, पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहा पोलिस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास रामगुडे, पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलिस निरीक्षक कडाळे, वसिम शेख, टकले, शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक आव्हाड, पोलिस हवालदार जगन्नाथ धुमाळ, पोलिस नाईक सुधील कदम, पाटील, नलावडे, पोलिस शिपाई विलास भोर व अमोल भोसले यांनी ही कामगिरी पार पाडली.

हृदयद्रावक! नवविवाहीत दांपत्य दुचाकीवरून निघाले असतानाच...

धक्कादायक! पत्नीला रात्री अचानक झोपेतून उठवले अन् म्हणाला...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: mumbai crime news navi mumbai trace murder case one arrested
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे