मुंबईत दुहेरी हत्याकांड; प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह तर...

मुंबईमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

मुंबई : मुंबईमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. लालबागमधील पेरू कम्पाऊंड परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडला आहे तर एका निर्माणाधीन इमारतीतून 19 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळाचौकी पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मृत महिलेचे वय 50 ते 55 वर्षांच्या दरम्यान आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिस मृत महिलेच्या मुलीची चौकशी करत आहेत. मुलीनेच खून करून मृतदेह पॅक करून कपाटात लपवून ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी २२ वर्षीय मुलीला ताब्यात घेण्यात आले असून तिची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

लालबाग परिसरातच एका 19 वर्षांच्या युवकाचा बाराव्या मजल्यावर हा मृतदेह सापडला आहे. मसूदमिया रमझान असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्या हत्येपूर्वी हातपाय बांधले होते. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही इमारत 45 मजल्यांची आहे. मुळचा पश्चिम बंगालचा असलेला युवक याच इमारतीत काम करत होता. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: mumbai crime news body of woman found in plastic bag in lalb
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे