हृदयद्रावक! माता चिमुकल्याला कुशीत घेऊन झोपली अन्...

घरातून बाहेर पडल्यानंतर एका रस्त्याच्या कडेला आडोशाला आपल्या बाळांना घेऊन झोपल्या होत्या.

मुंबई: एक माता चिमुकल्यांना कुशीत घेऊन रस्त्याच्या कडेला झोपली होती. गाढ झोपेत असतानाच 10 महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात आले. मातेला जाग आल्यानंतर धक्का बसला. सैरावैरा होऊन बाळाचा शोध घेऊ लागली. पण, बाळ सापडले नाही. पोलिसांकडे जाऊन माहिती दिली. पोलिसांनी अवघ्या 48 तासाताच मायलेकरांची भेट घडवून आणली. बाळाला हातात घेतल्यानंतर मातेला अश्रू अनावर झाले होते.

व्हायरल! खासदार संजय राऊत काय गुंड आहेत का ?

फिर्यादी महिलेचे नाव मुमताज (वय 40, रा. नालासोपारा) आहे. काही दिवसांपूर्वी त्या आपल्या दोन्ही मुलांना घेऊन भावाकडे माहीम याठिकाणी राहायला आल्या होत्या. 1 सप्टेंबर रोजी फिर्यादी मुमताज यांचा आपल्या भावासोबत घरगुती कारणातून वाद झाला होता. त्यामुळे मुमताज आपल्या दोन्ही मुलांना घेऊन रागाच्या भरात घराबाहेर पडल्या होत्या. घरातून बाहेर पडल्यानंतर त्या माहिम परिसरातील एका रस्त्याच्या कडेला आडोशाला आपल्या बाळांना घेऊन झोपल्या होत्या. आरोपीने 10 महिन्याच्या बाळाचं अपहरण केले. यानंतर मुमताज यांनी बांद्रा पोलिस तक्रार दाखल केली होती.

अनिल देशमुख यांचा चौकशी अहवाल लीक करण्यासाठी काय मिळाले होते पाहा....

फरहाना शेख हिच्यावर आपल्याला संशय असल्याचे मुमताज यांनी पोलिसांना सांगितले. कारण संबंधित महिलेने फिर्यादीला आणि तिच्या बाळाला जेवण आणून दिले होते. तसेच बाळाला मला देशील का? असेही विचारले होते. यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेचे स्केच बनवून आपल्या सूत्रांकडे पाठवले. त्यानंतर संबंधित महिला बांद्रा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी सापळा रचून आरोपी महिलेला माहिम दर्गा परिसरातून अटक केली. तिने बाळाला परंदाम गुंडेती नावाच्या व्यक्तीला दिले असून, तो खार दर्गा परिसरात वास्तव्याला असल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत त्यालाही अटक केली. गुंडेतीला अटक केली असता, त्याने बाळाला तामिळनाडूत विकले असल्याचे सांगितले. आरोपी गुंडेतीला घेऊन मुंबई पोलिसांचं पथक तामिळनाडूला रवाना झाले. येथून पोलिसांनी नाक्का राजू नरसिम्हा (वय 35) आणि विशिरिकाप्ल्या धर्मराव (वय 50) या दोघांना अटक केली.

भ्रष्टाचाराच्या आरोपाविरोधात संजीव पलांडे उच्च न्यायालयात...

आरोपी धर्मराव हा सरकारी नोकर असून त्याला मुलबाळं नाही. त्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी नरसिम्हाकडे बाळ मिळेल का अशी मागणी केली होती. तेव्हा आरोपी नरसिम्हाने आरोपी फरहाना शेख आणि आरोपी परंदाम गुंडेती यांची ओळख करुन दिली होती. याप्रकरणी न्यायालयाने आरोपी शेखला 8 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहेत. मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या 48 तासांत परराज्यात विकलेल्या चिमुकला आईच्या कुशीत विसावला.

बापरे! मुलीच्या तोंडात कापसाचा बोळा घातला अन्...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: mumbai crime news baby kidnapped and sold in tamilnadu in 48
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे