मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पुन्हा भीषण अपघात...

अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आमगाव येथे मोटार आणि टेम्पो मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मोटारीमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुंबई: अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आमगाव येथे मोटार आणि टेम्पो मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मोटारीमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबईकडून गुजरातकडे जाणारी भरधाव क्रेटा कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि ती टेम्पोवर जाऊन धडकली. यावेळी झालेल्या भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव क्रेटा मोटार डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोवर धडकली . हा अपघात इतका भीषण होता की मोटारीमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर वापी येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. शिवाय, वाहतूक सुरळीत सुरू केली. मृतांची नावे समजू शकलेली नाहीत. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघातही याच महामार्गावर झाला होता.

मोठी बातमी! टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू...

पुण्याजवळ शिवशाही बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर...

सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर बसला भीषण अपघात...

काळाची झडप! दुचाकीवर लिहिले होते शेवटी नशीब...

पुणे-सोलापूर महामार्गावर मोटारीचा पाठलाग करत केले फायरींग अन्...

पुण्यावरून लग्नासाठी निघालेल्या वाहनाला अपघात; सहा ठार...

महामार्गावर गायीला वाचवताना भीषण अपघात; पाहा मृतांची नावे...

अमरावतीत भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे...

पुणे-नगर महामार्गावर दुचाकींमध्ये भीषण अपघात; तिन युवकांचा मृत्यू...

शिरुर तालुक्यात कंटेनरच्या विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू

नागपूरजवळ ट्रक-मोटारीमध्ये भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: mumbai ahmedabad highway accident news 3 died and 2 seriousl
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे