बार्शी येथील विशाल नागरगोजे यांची डीवायएसपी पदी निवड...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 13 ते 15 जुलै, 2019 या कालावधोत राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - 2019 घेण्यात आली होती.

बार्शी (सोलापूर): राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये बार्शीच्या विशाल नागरगोजे यांची DYSP पदी निवड झाली. विशाल हे बार्शीचे रहिवासी असून, येथील महाराष्ट्र विद्यालयाचे विदयार्थी आहेत. याआधी MPSC मधील विक्रीकर निरीक्षक, ACST पदी त्यांची निवड झाली होती.

चिमुकलीला उपचारासाठी हवाय तुमच्या मदतीचा हात...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 13  ते 15 जुलै, 2019 या कालावधोत राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - 2019 घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे हा भरतीचा निकाल लागण्यास उशीर झाला होता. शिवाय, मराठा आरक्षणाचा मुद्दाही ऐरणीवर असल्यामुळे हा निकाल लागण्यास उशीर झाला होता. अनेक जणांना पद मिळूनही त्याच्या नियुक्त्या होऊ शकल्या नव्हत्या. उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार पदांसाठी ही भरती घेण्यात आली होती. MPSC ना या निकालात निवड झालेल्या एकूण 420 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Video: प्रवाशांनी भरलेली एसटी पाण्यात कोसळली...

शासनाकडून आलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनेनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता आरक्षित असलेली पदं ही खुल्या प्रवर्गामध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा निकाल लावण्यात आला आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातून प्रसाद चौगुले यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर मागास वर्गातून रोहन कुंवर यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे. तसंच महिला प्रवर्गातून मानसी पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे.

धक्कादायक! MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्निलची सुसाईट नोट पाहा...

दरम्यान, पुण्यातील MPSC चा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने नियुक्ती नसल्यामुळे आत्महत्या केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात MPSC चा मुद्दा गाजला होता. त्यानंतर आता हा निकाल लावण्यात आल्यामुळे राज्यातील अनेक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: mpsc result 2019 declared barshi vishal nagargoje dysp list
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे