सरकारची 16 यूट्यूब चॅनेल्सवर कारवाई, पाकचे चॅनेल्स...

केंद्र सरकारने फेक न्यूज पसरवणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली असून, १६ यूट्यूब न्यूज चॅनेलवर कारवाई करत ते ब्लॉक केले आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने फेक न्यूज पसरवणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली असून, सोमवारी १६ यूट्यूब न्यूज चॅनेलवर कारवाई करत ते ब्लॉक केले आहेत. यामध्ये 6 पाकिस्तानी चॅनेल्सचाही समावेश आहे.

'मोबाईल सिम बंद होणार आहे. केवायसी करा' असा मेसेज आला तर...

प्रसारण मंत्रालयाने सांगितले आहे की, ब्लॉक करण्यात आलेल्या अकाउंटमध्ये 6 अकाउंट हे पाकिस्तानमधील आणि 10 भारताशी निगडीत आहेत. ज्याची एकूण दर्शक संख्या 68 कोटींहून अधिक आहे या चॅनेलवरून भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध, देशातील जातीय सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित विषयांवर सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवण्यात येत होत्या. त्यामुळे हे चॅनेल ब्लॉक करण्यात आली आहेत. याच्याआधीही फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया खात्यांसह 60 YouTube चॅनेलवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून कारवाई करण्यात आली होती. ती 60 YouTube चॅनेल ब्लॉक करण्यात आली होती.

युवकाने दिवंगत वडिलांचे लाखो रुपये ऑनलाईनमध्ये गमावले...

काही यूट्यूब चॅनेलवरून दहशत निर्माण केली जात आहे. तर जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि भारतातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासाठी एका समुदायाला आतंकवादी म्हणून दाखवले जात होते. तर इतर धर्मांना उक्सवलं जात होते. पाकिस्तानी चॅनेलवरून भारतीय सेना, जम्मू आणि काश्मीर, युक्रेन युद्धाशी निगडीत भारत संबंधांना घेऊन फेक न्यूज पसरवल्या जात होत्या. मात्र, या सर्व गोष्टी भारताने फेटाळल्या असून त्या चूकीच्या असल्याचे म्हटले आहे.

फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून लग्न करायचे आहे; असे म्हणाली अन्...

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 23 एप्रिल रोजी खाजगी टीव्ही वृत्तवाहिन्यांना खोटे दावे आणि निंदनीय मथळे वापरण्यापासून परावृत्त करण्याचा सल्ला दिला होता. मंत्रालयाने तपशीलवार सल्लामसलत करून केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा 1995 च्या कलम 20 च्या तरतुदींचे पालन करण्याचे आवाहन केले होते, ज्यात त्याअंतर्गत विहित केलेल्या प्रोग्राम कोडचा समावेश आहे.

Video: सायबर गुन्हेगार ॲप डाऊनलोड करण्यास सांगतात अन्...

मी तुझ्या आत्याचा मुलगा बोलत आहे, असे म्हणाला अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: Ministry of Information and Broadcasting action youtube chan
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे