धक्कादायक! प्रेयसीने साखरपुड्याच्या दिवशीच उचचले मोठे पाऊल...

राजेंद्र याचे सोना देवी नावाच्या विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते. पण, काही दिवसांपूर्वी राजेंद्र याचे लग्न ठरले होते.

प्रतापगढ (उत्तर प्रदेश): विवाहीत प्रेयसीने प्रियकराच्या साखरपुड्याच्या दिवशीच मोठे पाऊल उरलत त्याची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी महिलेला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

संतापजनक! बलात्कार करून महिलेच्या गुप्तांगात टाकला रॉड...

संबंधित घटना सांगीपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मरैनी गावात घडली आहे. मैरनी गावातील रहिवासी असणाऱ्या राजेंद्र वर्मा याचे रामनगर भोजपूर येथील सोना देवी नावाच्या विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते. पण, काही दिवसांपूर्वी राजेंद्र याचे लग्न ठरले होते. आपल्या प्रियकराचे लग्न होत असल्यामुळे प्रेयसी दु:खी झाली होती. यामुळे प्रेयसीने आपला भाऊ आणि त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने राजेंद्रच्या हत्येचा कट रचला.

माणूसकीला काळीमा! चिमुकलीवर बलात्कार करून काढले डोळे...

प्रियकराला लखनौ येथून आपल्या चारचाकी गाडीत बसवले होते. प्रेयसीचा भाऊ आणि त्याचे अन्य दोन मित्र या गाडीत आधीपासूनच बसले होते. काही अंतर गेल्यानंतर प्रेयसीने भाऊ आणि अन्य दोन साथीदारांनी राजेंद्रची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर आरोपींनी एका नाल्यात राजेंद्रचा मृतदेह टाकून घटनास्थळावरून पळ काढला. घटनेच्या तीन दिवसांनी राजेंद्र याचा मृतदेह नाल्यात आढळला. याप्रकरणी तपास करत पोलिसांनी मुख्य सुत्रधार आरोपी प्रेयसी सोना देवीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

धक्कादायक! नर्सचा ड्रेस घालून रुग्णालयात आली अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: married woman killed her boyfriend on his engagement day up
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे