अभिनेत्री केतकी चितळे हिची वादग्रस्त पोस्ट; गुन्हा दाखल...
अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाणे : अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तिच्या विरोधात कळवा पोलिस स्टेशनमध्ये 153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने आता केतकी चितळे अडचणीत आली आहे.
अमिषा पटेलने घेतले 3 मिनिटांचे 4 लाख रुपये? गुन्हा दाखल...
कळवा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, 'केतकी चितळे हिने राजकीय व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या संबधाने बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे आमच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये भावनिक व तीव्र नाराजीची भावना निर्माण झाल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मी स्वत: व माझे सारखे इतर कार्यकर्ते उद्वीग्न झालेलो आहोत. तसेच केतकी चितळे हिने ही पोस्ट करुन भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेशाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक कृत्य केले आहे. सदर महिलेने आणखी देखील पोस्ट केल्या असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शरद पवारांना उद्देशून बदनामीकारक आणि द्वेषकारक पोस्ट करणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार देण्यात येत आहे.'
दरम्यान, केतकी चितळे हिने यापूर्वीही वादग्रस्त पोस्ट फेसबुकच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एका कॉमेडियनने वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर चौफेर टीका झाली. मात्र त्यानंतर मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आक्रमक फेसबुक लिहित कॉमेडियनवर टीका करणाऱ्यांचाच समाचार घेतला होता. त्यानंतर केतकीच्या या पोस्टवरून मराठीतील ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी केतकी चितळे हिच्यावर निशाणा साधला होता.
अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात चोरी; काय गेले पाहा...
अभिनेता सलमान खानला समन्स जारी; कारण पाहा...