संतापजनक! मारहाण, उठा-बशा काढायला लावून चाटायला लावली थुंकी...

संबंधित घटनेचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री सीएम हेमंत सोरेन यांनी या घटनेची दखल घेतली आहे.

धनबाद (झारखंड): भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण करून थुंकी चाटायला लावल्याची संतापजनक घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी टिकेची झोड उठवली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन  यांनी या घटनेची दखल घेतली असून, संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या मोठ्या चुकीनंतर धनबादमध्ये भाजपाकडून 'सद्बुद्धी मौन आंदोलन'चं आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी वाहतूक पोलिसांचा ताफाही घटनास्थळी तैनात होता. भाजपचे धनबादचे खासदार पीएन सिंह आणि भाजप आमदार राज सिन्हा यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. याच दरम्यान येथील एका व्यक्तीने भाजपाच्या प्रदेश अध्यक्षांना गोळी मारण्याची धमकी दिली. तसेच अपशब्द वापरले. संतापलेल्या भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला बेदम मारहाण केली. तसेच त्याला उठाबशा काढायला लावल्या आहेत. यासोबतच कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला मारहाण करत त्याला जमिनीवरील थुंकी चाटायला भाग पाडले. तसेच 'जय श्री राम'च्या घोषणा द्यायला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

Bulli Bai App च्या मास्टरमाईंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

संबंधित घटनेचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री सीएम हेमंत सोरेन यांनी या घटनेची दखल घेतली आहे. तसेच ट्विट करून पोलिसांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शांततेत जीवन जगणाऱ्या झारखंडवासीयांच्या राज्यात शत्रुत्वाला जागा असू शकत नाही, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भाजप आमदाराला कुटुंबीयांसह जीवे मारण्याची धमकी...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: man beaten by bjp workers and forced to lick spit in jharkha
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे