उत्तर प्रदेशात भीषण अपघात; पुण्यातील चार जणांचा मृत्यू; पाहा नावे...
आग्र्याहून नोएडाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.आग्रा (उत्तर प्रदेश): आग्र्याहून नोएडाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर प्रवासी जखमी झाले आहेत. आग्र्याहून नोएडाच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो आणि डम्पर यांच्यात धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात बोलेरो गाडीतील सात पैकी पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
नागपूरजवळ ट्रक-मोटारीमध्ये भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात एक्सप्रेस वे वरील 40 किमी माइलस्टोन जवळ झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या पाच पैकी चौघेजण हे महाराष्ट्रातील निवासी आहेत. तर अपघातात दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ योग्य ते उपचार देण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू
मृतांची नावेः
चंद्रकांत नारायण बुराडे (वय 68 वर्षे) - बारामती, पुणे
स्वर्णा चंद्रकांत बुराडे (वय 59 वर्षे) - बारामती, पुणे
मालन विश्वनाथ कुंभार (वय 68 वर्षे) - बारामती, पुणे
रंजना भरत पवार (वय 60 वर्षे) मराठा नगर, बारामती, पुणे
नुवंजन मुजावर (वय 53 वर्षे) बेळगाव, चिकोडी कर्नाटक
जखमींची नावे:
नारायण रामचंद्र कोळेकर (वय 40 वर्षे) फलटण, सातारा
सुनीता राजू गस्ते (वय 35 वर्षे) बेळगाव
मारायचे होते मुलाला, खून केला वडिलांचा; आठ तासात अटक...
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो गाडीत एकूण सात प्रवासी प्रवास करत होते. हे सर्वजण आग्र्याहून नोएडाच्या दिशेने जात होते. बोलेरो गाडी जेवर टोल प्लाझापासून काही अंतरावर होती त्याच वेळी भारधाव गाडी समोरील डंपरला पाठीमागून जोरदार धडकली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत.
नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?
भोंगा, हनुमान चालिसापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा नाही का?
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...