महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा

आशिष लता रामगोबिन (वय 56) यांना डरबनच्या एका न्यायालयाने ६० लाख रुपये फसवणुकीच्या आरोपात ७ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

कॅपे टाऊन (दक्षिण आफ्रिका): दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पणती आशिष लता रामगोबिन (वय 56) यांना डरबनच्या एका न्यायालयाने ६० लाख रुपये फसवणुकीच्या आरोपात ७ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सोमवारी त्यांचा निर्णय सुनावत आशिष लता रामगोबिनला दोषी ठरवले आहे.

पाकिस्तानमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, 30 जणांचा मृत्यू

स्वत:ला व्यावसायिक असल्याचं भासवत आशिष लताने स्थानिक व्यावसायिकाची फसवणूक करत त्यांच्याकडून ६२ लाख रुपये हडपले. या घटनेतील पीडित एसआर महाराज यांनी सांगितले की, नफ्याचे आमिष दाखवून माझ्याकडून पैसे घेण्यात आले. व्यावसायिक एसआर महाराज यांनी आशिष लता यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. महाराजने लता यांना एक कन्साइमेंट इम्पोर्ट आणि कस्टम क्लिअर करण्यासाठी ६२ लाख रुपये दिले होते. परंतु अशाप्रकारे कोणतेही कन्साइमेंट नव्हते. होणाऱ्या नफ्यातून काही वाटा एसआर महाराज यांना देऊ असं आमिष लताने दिले होते.

Mahatma Gandhi's great-grandaughter Ashish Lata Ramgobin sentenced to 7 years in jail for fraud case in South Africa

लता रामगोबिन या प्रसिद्ध मानवाधिकार इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिंद यांची मुलगी आहे. लता यांना डरबन विशेष व्यावसायिक क्राईम कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर शिक्षेविरोधात अपील करण्यास परवानगी नाकारली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत कोर्टाने सांगितले की, लता रामगोबिन यांची न्यू आफ्रिकेतील अलायंस फुटविअर डिस्ट्रीब्यूटर्सचे संचालक एसआर महाराज यांच्यासोबत ऑगस्ट २०१५ मध्ये भेट झाली होती. महाराज यांची कंपनी लिननचे कपडे आणि बूट आयात, उत्पादन आणि विक्री करतं. त्याचसोबत त्यांची कंपनी इतर कंपन्यांना प्रोफिट शेअरच्या आधारे पैसे देते. लता रामगोबिन यांनी महाराज यांना सांगितले की, त्यांनी दक्षिण आफ्रीकी हॉस्पिटल ग्रुप नेटकेअरसाठी लिननच्या कपड्यांचे ३ कंटेनर भारतातून आयात केले आहेत.

बापरे! 'वजनदार' पत्नी अंगावर बसल्याने पतीचा गुदमरून मृत्यू

NGO इंटरनॅशनल सेंटर फॉर नॉन वायलेंसमध्ये कार्यकारी संचालक असणाऱ्या रामगोबिनने स्वत:ला पर्यावरण, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता असल्याचं सांगितले. दरम्यान, इला गांधी यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कामासाठी अनेकदा सन्मानित करण्यात आले आहे.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: Mahatma Gandhi s great grandaughter jailed for 7 years in so
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे