Video: अनलॉकनंतर महामार्गावर झाली वाहतूक कोंडी...

निर्बंध शिथील झाल्यामुळे रस्त्यावरील वर्दळ मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

पुणे: राज्यात तब्बल अडीच-तीन महिन्यांनंतर आजपासून (सोमवार) लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये वर्गवारी केली आहे. आज लॉकडाऊन उघडताच नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पुणे-नगर महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे आज पाहायला मिळाले.

रात्रच नव्हे तर दिवस देखील वैऱ्याचा: मुख्यमंत्री

पुणे जिल्ह्यात निर्बंध शिथील झाल्यामुळे रस्त्यावरील वर्दळ मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पुणे-नगर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. वाघोली येथे वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे. नागरिकांनी आज सकाळपासूनच कामासाठी घराबाहेर पडायला सुरवात केली आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. अनलॉक मुळे आता आंतरजिल्हा बंदी असली तरी ई-पास गरजेचा आहे. दरम्यान, राज्यातील विविध भागांमध्ये आज वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अनलॉकबाबत नियमावली जाहीर, कोणता जिल्हा कधी पाहा...

कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि 5 पातळ्या (लेव्हल्स) ठरविल्या आहेत. त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

पुणे अनलॉकच्या दिशेने; पाहा काय सुरू आणि काय बंद...

दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात अनलॉकिंगला सुरुवात झाली आहे. पण पूर्णपणे अनलॉक करण्यात आलेलं नाही. तर काही अटीच शिथिल केल्या आहेत. एकूण 43 युनिट तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी 18 युनिटलाच अनलॉकिंगची परवानगी मिळाली आहे. अजून कोरोना संपलेला नाही. त्यामुळे पुन्हा कोरोना वाढल्यास जनता जबाबदार राहील. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे. मास्क न घालता वावरल्यास कठोर कारवाई होईल, असा इशारा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

...तर तुम्हाला टोलमाफ; जाणून घ्या नव्या गाइडलाइन्स

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: maharashtra unlock traffic jam at pune nagar highway video
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे