अनलॉकबाबत नियमावली जाहीर, कोणता जिल्हा कधी पाहा...

आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्यात होणार आहे. म्हणजेच येत्या सोमवारपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात अक्षरशः थैमान घातले होते. पण, आता हा लाट काही प्रमाणात ओसरताना दिसत आहे. त्यामुळे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी अनलॉक संदर्भात घोषणा केली होती. मात्र, काही तासातच राज्य सरकारने खुलासा करून कोणतीही नियमावली अद्याप निश्चित करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अखेर शुक्रवारी (ता. 4) मध्यरात्री नियमावली जारी करण्यात आली आहे.

राज्यात अनलॉक नाहीच; सरकारचा तासाभरात यू टर्न...

या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्यात होणार आहे. म्हणजेच येत्या सोमवारपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आलेत. त्यानुसार त्या त्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक होईल.

खासगी हॉस्पिटल्सना दणका, कोविड उपचारासाठी दर जाहीर

अशा असतील पाच लेवल -
लेवल 1 - पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेड 25% पेक्षा कमी भरलेले आहेत. या टप्प्यात सर्व व्यवहार खुले करण्यात येतील.
लेवल 2 - पॉझिटिव्हिटी रेट 5% आणि ऑक्सिजन बेड 25% ते 40% भरलेले आहेत, असे जिल्हे
लेवल 3 - पॉझिटिव्हिटी रेट 5% ते 10% आणि ऑक्सिजन बेड 40% हून अधिक भरलेले आहेत. याठिकाणी व्यवहार सायंकाळी ५ वाजता बंद होतील.
लेवल 4- पॉझिटिव्हिटी रेट 10% ते 20% आणि ऑक्सिजन बेड 60% असलेले जिल्हे. सायंकाळी ५ नंतर व्यवहार बंद होतील आणि शनिवार, रविवारी व्यवहार बंद असतील.
लेवल 5- पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्याहून अधिक आणि 75% टक्क्याहून अधिक ऑक्सिजन बेड भरलेले जिल्हे

पुणे अनलॉकच्या दिशेने; पाहा काय सुरू आणि काय बंद...

पहिल्या स्तरात मोडणाऱ्या ठिकाणी मॉल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांच्या वेळेचे बंधन नसेल. मात्र, लोकल सेवेबाबतचा निर्णय त्याठिकाणचं स्थानिक प्रशासन घेईल. सार्वजनिक मैदानं, वॉकींग, सायकलिंग याला परवानगी, 100टक्के क्षमतेनं सरकारी कार्यालये खुली. खेळ, शूटींग, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी, लग्न समारंभ, अंत्यसंस्कार यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध राहाणार नाही.

...तर तुम्हाला टोलमाफ; जाणून घ्या नव्या गाइडलाइन्स

दुसऱ्या स्तरातील ठिकाणी मॉल आणि सिनेमा हॉलमध्ये ५० टक्केच उपस्थितीची अट राहील.
तिसऱ्या स्तराच्या ठिकाणी दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील. सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील.
चौथ्या स्तरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील आणि अन्य दुकाने बंद राहतील.
पाचव्या स्तरातील ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ पर्यंतच सुरू राहतील. शनिवार, रविवारी ती बंद असतील.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांना घेता येणार लस; कशी ती पाहा...

हे आहेत पाच स्तरातील जिल्हे
पहिला स्तर: अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, ठाणे, वर्धा
दुसरा स्तर: औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी,
तिसरा स्तरः अकोला, अमरावती, बीड, पुणे, वाशिम, यवतमाळ
चौथा स्तर: रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग,
पाचवा स्तर: कोल्हापूर

कोरोनाच्या काळात मोफत धान्य योजनेमध्ये झालाय मोठा घोटाळा?

वरील दिलेल्या यादीनुसार, त्या त्या स्तरावर जिल्हे अनलॉक केले जातील. या आदेशानुसार पहिल्या आणि दुसऱ्या स्तरात जे जिल्हे येणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. शिवाय, दर आठवड्याला कोरोनाच्या परिस्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: maharashtra unlock from monday read government guidelines
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे