विद्यमान आमदार ठरले 'सेक्सटॉर्शन' गुन्हेगारीची शिकार...

आरोपीस राजस्थान येथून अटक

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना, शहरात वास्तव्यास असलेले विद्यमान आमदार यशवंत विठ्ठल माने हे देखील या गुन्हेगारीची शिकार ठरले आहेत. आरोपींनी सोशल मिडीयावरून यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून, माने यांच्याशी व्हाट्सअॅपवर संपर्क करून वेळोवेळी अश्लिल संदेश पाठवले. तसेच अश्लिल व्हिडीओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचा प्रयत्नही केला.

पुणे : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना, शहरात वास्तव्यास असलेले विद्यमान आमदार यशवंत विठ्ठल माने हे देखील या गुन्हेगारीची शिकार ठरले आहेत. आरोपींनी सोशल मिडीयावरून यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून, माने यांच्याशी व्हाट्सअॅपवर संपर्क करून वेळोवेळी अश्लिल संदेश पाठवले. तसेच अश्लिल व्हिडीओ कॉल करून त्यांना भुरळ पाडण्याचा प्रयत्नही केला. रेकॉर्ड केलेला व्हिडीओ कॉल फिर्यादीच्या फेसबुकवर असलेल्या मित्रांना पाठविण्याची धमकी देऊन चार लाख रूपये इतक्या रकमेच्या खंडणीची मागणी आरोपींनी केली. मागणी केलेली रक्कम तत्काळ दिली नाही तर रेकॉर्ड केलेला अश्लिल व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी फिर्यादी यांना दिल्याने सायबर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखलकरण्यात आला.

गुन्ह्यातील फिर्यादी यांना संपर्क करण्याकरिता वापरलेला मोबाईल क्रमांक ७६९९८९९२२६ याचे तांत्रिक विश्लेषण केले असता, आरोपी हे भरतपूर, राजस्थान येथील असल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलिसांनी शोध घेतला असता, आरोपी रिझवान अस्लाम खान (वय -२४ वर्षे, रा. ग्राम सिहावली महारायपूर, ता. नगर, जि. भरतपूर, राजस्थान) असल्याचे आढळले. प्राथमिक तपासात त्याचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली. आरोपीकडून एकूण ४ मोबाईल संच व ४ सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत. आरोपीकडून जप्त केलेल्या मोबाईल संचामध्ये स्क्रिन रेकॉर्ड केलेल्या एकूण ९० अश्लिल व्हिडीओ आढळले आहेत. आरोपीस न्यायालया समक्ष हजर केले असता, न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केलेली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक बलभिम ननवरे करीत आहेत.

नागरिकांना आव्हान...
पुणे शहरातील नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की, मोबाईल नं. ७७४२६७०३५८. ८८६५०२४८६२, ८००१९७०१७८ ९५८७३४२८२८ या मोबाईल क्रमांकावरून संपर्क करून अश्लिल व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित करण्याची धमकी देऊन पैसे मागितले असल्यास किंवा मागत असल्यास तत्काळ सायबर पोलिस स्टेशन, पोलिस मुख्यालय मैदान, शिवाजीनगर, पुणे शहर या कार्यालयात किंवा ७०५८७१९३७५/ ७०५८७१९३७१ यावर संपर्क करावा.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार साहेब, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे, पुणे शहर पळसुले यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिनल सुपे पाटील, सहा. पोलीस निरीक्षक बलभिम ननवरे, पोलीस उप निरीक्षक सचिन जाधव, राजकुमार जावा, शिरीष गावडे, श्रीकृष्ण नागटिळक. संदीप यादव, प्रविणसिंग राजपुत, पुजा मांदळे यांचे पथकाने केली आहे.

Title: maharashtra state crime mla pune sextortion cyber crime raja
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे