एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा; संप सुरुच...

राज्य सरकारने पगारवाढीची जी घोषणा केली ती खरंतर 2012 सालीच होणे अपेक्षित होते. विलीनीकरणाची घोषणा झाली नाही तर कामबंद आंदोलन सुरुच ठेवणार, अशी घोषणा कर्मचाऱ्यांनी केली.

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तिढा सोडण्यासाठी परिवन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांची विविध कॅटेगिरीनुसार अडीच हजार ते पाच हजार पगारवाढीची घोषणा केली. पण राज्य सरकारच्या या घोषनेनंरही एसटी कर्मचऱयांनी संप सुरूच ठेवला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव जरी मान्य झाला असला तरी विलीनीकरण हीच प्रमुख मागणी आहे. केवळ पगारवाढीच्या मुद्द्यावर कामबंद आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली आहे.

आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने घेतला जगाचा निरोप...

राज्य सरकारने पगारवाढीची जी घोषणा केली ती खरंतर 2012 सालीच होणे अपेक्षित होते. विलीनीकरणाची घोषणा झाली नाही तर कामबंद आंदोलन सुरुच ठेवणार, अशी घोषणा कर्मचाऱ्यांनी केली. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवारी (ता. २४) पत्रकार परिषध घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली. त्यांनी पहिल्या फळीतील 1 ते 10 वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात 5 हजार रुपयांच्या पगारवाढीची घोषणा केली. तसेच 10 ते 20 वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात 4 हजारांची वाढ केली. तसेच 20 वर्ष आणि त्याहून अधिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात 2500 रुपयांनी वाढ केली आहे. याशिवाय दर महिन्याला 10 तारखेच्या आत पगार होईल, याची काळजी घेतली जाईल, असे सांगितले.

धक्कादायक! एसटीत आणखी एका चालकाची आत्महत्या...

एसटी चालकाने एसटीमध्येच घेतला शेवटचा श्वास...

"जे कर्मचारी सेवेत एक वर्ष ते दहा वर्ष या कॅटेगिरीत आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट 5 हजार रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचं मुळ वेतन 12 हजार 80 रुपये होतं त्याचं आता 17 हजार 395 जालं आहे. त्याचं पूर्ण वेतन 17 हजार 395 होतं ते आता 24 हजार 694 झालं आहे. म्हणजे 7 हजार 200 रुपयांची वाढ पहिल्या कॅटेगिरीच्या कर्मचाऱ्यांसाठी केली आहे. पहिल्या कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांमध्ये पगाराबाबत नाराजी होती. त्यांचा आक्रोश गेल्या काही दिवसांमध्ये दिसला. त्यामुळे त्यांच्या पगारात फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या पगारवाढीपैकी ही एक मोठी वाढ आहे. जवळपास 41 टक्के ही पगारवाढ करण्यात आली आहे", अशी घोषणा अनिल परब यांनी केली.

...म्हणून एसटी चालकाने घेतला जगाचा निरोप

"10 ते 20 वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात आम्ही 4 हजारांची वाढ केली आहे. त्यामुळे ज्यांचं मुळ वेतन 16 हजार होतं. त्यांचा पगार मुळ वेतनाच्या 23 हजार 40 रुपये आहे. आता वाढ केल्यानंतर त्यांचा पगार 28 हजार 800 इतका झाला आहे", अशी माहिती त्यांनी दिली.

महिला पोलिस कर्मचाऱयाची गळफास घेऊन आत्महत्या...

"20 वर्ष आणि त्याहून अधिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात 2500 रुपयांनी वाढ केली आहे. ज्याचं स्थूल वेतन 37 हजार 440 होतं त्याचं वेतन आता 41 हजार 40 झालेलं आहे. ज्याचं स्थूलवेतन 53 हजार 280 होतं त्याचं वेतन 56 हजार 880 होईल", असेही अनिल परबा यांनी सांगितले.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: maharashtra st workers announced strike will not withdrawal
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे