'श्रेणी पोलिस उपनिरीक्षक (GRADE PSI)' असे संबोधन्यास मान्यता...

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील पोलिस अंमलदारांना 'श्रेणी पोलिस उपनिरीक्षक (GRADE PSI)' असे संबोधणेबाबत कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

पुणेः सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील पोलिस अंमलदारांना 'श्रेणी पोलिस उपनिरीक्षक (GRADE PSI)' असे संबोधणेबाबत कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस अंमलदार संवर्गासाठी पदोन्नतीच्या संधीमध्ये वाढ करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, गृह विभाग यांनी २५/०२/२०२२ रोजीचे शासन निर्णयान्वये सुचना निर्गमित केलेल्या आहेत. सदर शासन निर्णयानुसार पोलिस दलामध्ये किमान ३० वर्षे सेवा पूर्ण असलेले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर किमान तीन वर्षे सेवा पूर्ण असलेले आणि आश्वासित प्रगती योजनेनुसार पोलिस उपनिरीक्षक सवंर्ग पदाचे वेतन घेत आहेत, असे तीनही निकष पूर्ण करणा-या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील पोलिस अंमलदारांना 'श्रेणी पोलिस उपनिरीक्षक (GRADE PSI)' असे संबोधणेबाबत कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

गृह विभागाकडील २५/०२/२०२२ रोजीच्या शासन निर्णयास अनुसरुन पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयाकडून या संदर्भात वेळोवेळी प्राप्त झालेल्या सुचनांनुसार पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील जे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक हे शासन निर्णयातील तीनही निकषांची पुर्तता करीत आहेत. त्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील पोलिस अंमलदारांना “श्रेणी पोलिस उपनिरीक्षक (GRADE PSI)” असे संबोधणेबाबतची कार्यवाही पूर्ण करुन तसे आदेश निर्गमित करण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे आदेशास अनुसरुन अपर पोलिस आयुक्त, प्रशासन, पुणे शहर यांचे अध्यक्षतेखाली पोलिस उप-आयुक्त (मुख्यालय), सहाय्यक पोलिस आयुक्त (आस्थापना) व प्रशासकीय अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली होती. 

सदर समितीने वरील नमूद तीनही निकष पूर्ण करीत असलेल्या पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील एकूण १७० सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील अंमलदारांना “श्रेणी पोलिस उपनिरीक्षक ( GRADE PSI )" संबोधण्याची कार्यवाही पूर्ण करुन, तसे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ०२/०३/२०१९ रोजीचे शासन निर्णयास अनुसरुन सेवानिवृत्त झालेल्या एकूण १५२ पोलिस अंमलदार यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे. 'श्रेणी पोलिस उपनिरीक्षक ( GRADE PSI)' संबोधित झालेल्या सर्व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अंमलदार यांचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अभिनंदन केले.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: maharashtra police news grade psi name home minster and gove
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे