मुख्यमंत्र्यांनी विजयादशमीनिमित्त दिली पोलिसांना 'गुड न्यूज'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विजयादशमीनिमित्त 'गुड न्यूज' दिली आहे.

मुंबईः कोणताही सणवार, कोरोना काळ, ऊन-पाऊस-वादळ कशाचीही तमा न बाळगता कायदा व सुव्यवस्था राखणाऱया पोलिस हवालदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विजयादशमीनिमित्त 'गुड न्यूज' दिली आहे. वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलिस हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता येत नव्हते. त्यामुळे पोलिस हवालदारांच्या पदोन्नतीच्या संदर्भातील प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सेवानिवृत्तीपूर्वी पोलिस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न साकार होणार आहे.

या निर्णयामुळे अंमलदाराला अधिकारी पदावरून निवृत्त होता येईल. पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट फायदा येत्या काही महिन्यांत 45 हजार हवालदार, पोलिस सहाय्यक, पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकांना होईल. पोलिस शिपाई आता पोलिस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त होतील. पोलिस शिपायांना सर्वसाधारण 12 ते 15 वर्षांनंतर पदोन्नती मिळत असल्यामुळे त्यांचे मनोबल कमी होते. त्यांच्या कार्यक्षमतेवरही विपरीत परिणाम होतो. पोलिस अंमलदारांना पदोन्नतीमध्ये पोलिस शिपाई, पोलिस नाईक, पोलिस हवालदार, सहायक पोलिस उपनिरीक्षक अशा तीन पदोन्नतीच्या संधी मिळतात. सर्वसाधारणपणे एका पदावर दहा वर्षांच्या सेवेनंतर पदोन्नती मिळायला पाहिजे, पण वरच्या श्रेणीतील पदसंख्या कमी असल्यामुळे अपेक्षेपेक्षा दीर्घ कालावधी लागतो.

अमित शहा यांनी पाकिस्तानला दिला सर्जिकल स्ट्राईकचा इशारा...

पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचलेल्या पोलिसांचे मनोधैर्य व आत्मबल वाढवून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी हा प्रस्ताव तयार केला आहे. पोलिस उपनिरीक्षक पदावरून सध्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदावर तीन वर्षे सेवा पूर्ण होण्याआधीच काही जण सेवानिवृत्त होतात किंवा काही अंमलदार हे पोलिस हवालदार पदावरूनच सेवानिवृत्त होतात. अशा अंमलदारांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीची संधी मिळत नाही. त्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होईल.

पोलिस दलात सद्यस्थितीत प्रत्यक्ष कामकाजासाठी मिळणाऱया सुमारे 23 कोटी इतक्या मानवी दिवसामध्ये सुमारे 66 कोटी दिवस इतकी वाढ होईल. त्यातून गुन्हे उघडकीस येण्याबरोबर व गुह्यांना आळा घालण्यास मदत होईल. या प्रस्तावावर गेल्या सहा महिन्यांपासून काम सुरू होते. मुख्य सचिव सीताराम पुंटे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने कार्यवाही व शासन निर्णयही जारी करण्याचे आदेश देत हा प्रस्ताव मंजूर केला.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

जवान चंदू चव्हाण यांचे पाकिस्तानमधील छळावरील पुस्तक जरूर वाचा. ऑनलाईन विकत घेण्यासाठी क्लिक करा...

जवान चंदू चव्हाण

Title: maharashtra police good news cm uddhav thackerary announce
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे