राज्यातील पोलिसांसाठी गृह विभागाचा मोठा निर्णय...

महाराष्ट्रात कोरोनाचा डोके पुन्हा वर काढले असून, गृह विभागाने पोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबईः महाराष्ट्रात कोरोनाचा डोके पुन्हा वर काढले असून, गृह विभागाने पोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलिसांनाही आता वर्क फ्रॉम होम लागू होणार आहे. पोलिस दलातील 55 वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम लागू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात घोषणा केली.

प्रसारमाध्यमांसोबत बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, 'कोरोनाच्या वाढता धोक्यामुळे पोलिसांनाही संकटाचा सामना करावा लागत आहे. जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र पोलिसांना 24 तास रात्रंदिवस कामावर रुजू व्हावे लागत आहे. आतापर्यंत अनेक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मुंबईतही गेल्या 24 तासांमध्ये 71 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने 55 वर्षांवरील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याचा आदेश दिला आहे.'

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मोठी घोषणा...

'कोरोनाचा वाढता धोका पाहता पोलिसांच्या संरक्षणासाठी 55 वर्षांवरील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम लागू करण्यता आला आहे. त्यांनी कामावर न येता घरुनच काम करायचे आहे,' असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी; पाहा निर्बंध

बिर्याणीची ऑडिओ क्लिप ऐकली, विषय गंभीरः वळसे पाटील

महाराष्ट्र पोलिस दल हे सर्वोत्तम: गृहमंत्री वळसे-पाटील

राज्यात डिसेंबर पर्यंत 5200 पोलिसांची भरती: गृहमंत्री

पोलिस दलातील बदल्यांमध्ये पारदर्शकता महत्वाचीः दिलीप वळसे पाटील

राज्यातील पोलिस शिपायांना उपनिरीक्षकापर्यंत मजल मारता येणार: गृहमंत्री

महाराष्ट्र पोलिस सदैव तुमच्या पाठीशी: मुख्यमंत्री

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: maharashtra police corona time good work from home 55 year o
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे