महाराष्ट्रात AMBIS प्रणाली कार्यान्वित; भारतातील पहिले राज्य...

महाराष्ट्रात Automated Multimodal Biometric Identification System (AMBIS) ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

पुणेः महाराष्ट्रात Automated Multimodal Biometric Identification System (AMBIS) ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. संगणकीय प्रणालीचे उदघाटन  रितेश कुमार, अपर पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १३) पार पडले. 

राज्य सरकारकडून राज ठाकरे यांच्यासाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण....

पुर्वी गुन्हेगारांच्या बोटांच्या ठशावरुन आरोपीची ओळख पटवली जायची. मात्र, आता हाताचे तळवे, सीसीटीव्ही फुटेजमधील चेहरा व छायाचित्रावरुनही गुन्हेगारांची ओळख पटविण्यात येणार आहे. AMBIS प्रणाली आरोपींच्या अंगुली मुद्रा पत्रिका, तळहाताच्या पत्रिका, चेहरा व डोळयांची बुबुळे हे डिजीटल स्वरुपात जतन करुन मॅचिंग करण्याची क्षमता आहे. पोलिस ठाणे स्तरापर्यंत AMBIS यंत्रणा राबविणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य हे आहे. या यंत्रणे अंतर्गत सुमारे 6.5 लाख अटक व शिक्षाप्राप्त आरोपीचा अभिलेख संगणकीकृत करण्यात आलेला आहे. AMBIS प्रणाली ही भविष्यात CCTNS, PRISM, CCTV व राष्ट्रीय स्तरावरील NAFIS या प्रणालींशी जोडण्यात येणार आहे.

शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट करणारा पोलिसांच्या ताब्यात...

राज्यातील सर्व पोलिस ठाणे, परिक्षेत्रीय कार्यालये, पोलिस आयुक्तालय, जिल्हा पोलिस मुख्यालय, अंगुली मुद्रा केंद्रे, प्रशिक्षण केंद्रे व मध्यवर्ती कारागृह येथे AMBIS प्रणालीचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. AMBIS प्रणालीचे आधुनिक तंत्रज्ञान हे M/s Smartchip India Ltd/ IDEMIA प्रकल्प समन्वयक कंपनीने केले आहे. सदर तंत्रज्ञान हे NIST Compliance असुन Interpol व FBI येथे ही सदर तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. पोलिस ठाण्यात अटक आरोपींच्या अंगुली मुद्रा पत्रिकांचे Online Registration करुन त्यांचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा पुर्व इतिहास तपासण्यासाठी व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी या संगणकीय यंत्रणेचा उपयोग होणार आहे. AMBIS प्रणालीतर्गत देण्यात येणा-या Portable AMBIS या यंत्रणेचा वापर करुन गुन्हयांच्या घटनास्थळी मिळालेल्या चान्सप्रिंटव्दारे गुन्हेगारांचा शोध घेणे काही मिनिटातच शक्य झाले आहे. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमाणात वाढ होवून राज्याच्या दोषसिध्दीच्या प्रमाणात वाढ होणार आहे. AMBIS प्रणाली ही प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असुन यंत्रणेची गती व अचुकता यामुळे ती इतर प्रणालींपासुना वेगळी ठरली आहे. महाराष्ट्र राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी AMBIS यंत्रणा महत्वाची भुमिका पार पडणार आहे. Pilot व Testing फेजमध्ये AMBIS प्रणालीवर सन 2020 पासुन एप्रिल 2022 पर्यंत 52 केसमध्ये 2.14 कोटींची मालमत्ता चोरीस गेली होती त्या केस मध्ये आरोपींचा शोध लावण्यात आला.

अभिनेत्री केतकी चितळे हिची वादग्रस्त पोस्ट; गुन्हा दाखल...

AMBIS प्रणालीच्या उद्घघाटनाच्या कार्यक्रमाची प्रस्तावना सुधीर हिरेमठ, पोलिस उपमहानिरीक्षक गु.अ.वि, पुणे यांनी केली. उद्घाटनाच्या कार्यक्रमास  सुरेश मेखला, विशेष पोलिस महानिरीक्षक (पश्चिम), गु.अ.वि पुणे, रंजनकुमार शर्मा, पोलिस उपमहानिरीक्षक गु.अ.वि, पुणे,  संजय शिंत्रे पोलिस अधिक्षक, महाराष्ट्र सायबर, मुंबई तसेच अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड, अभिनव देशमुख पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामिण, सेवानिवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक ए.डी. शिंदे, सेवानिवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. देशपांडे हे निमंत्रित म्हणुन उपस्थित होते. गुन्हे अन्वेषण विभागाचे सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी, अंगुली मुद्रा विभागाचे रोहीदार कसार- वरिष्ठ तज्ञ/ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अविनाश सरवीर, प्रथम तज्ञ/ पोलिस निरीक्षक (अं.मु), श्रीमती. रुपाली गायकवाड, प्रथम तज्ञ/ पोलिस निरीक्षक (अं.मु) यांचेसह अंगुली मुद्रा केंद्रातील सर्व अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलिस आयुक्तालय/ परिक्षेत्रीय कार्यालये जिल्हा कार्यालय येथील वरिष्ठ अधिकारी हे Online पध्दतीने उपस्थित होते.

रूबी हॉल क्लिनिक किडनी तस्करी प्रकरणात मोठी कारवाई

AMBIS प्रणाली हि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित असून, पोलिस दलाने आधुनिकीकरणाची कास धरुन केवळ बोटांचे ठसेच नाही तर तळवे,चेहरा व डोळे स्कॅन करुन ते डिजिटल पध्दतीने साठवून ठेवण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलिस घटकांनी सदर यंत्रणेचा वापर करुन गुन्हयांची झटपट उकल करुन दोषसिध्दीचे प्रमाणात वाढ होईल असे रितेश कुमार, अपर पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संबोधित केले.

अनिल देशमुख यांची मागणी न्यायालयाने फेटाळली; त्यामुळे...

नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?

भोंगा, हनुमान चालिसापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा नाही का?

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: maharashtra police amibis system launch first state in india
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे