राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढवला; पाहा कधीपर्यंत...

राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. काही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने आज (बुधवार) घेतला आहे. सध्या ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम होते. त्यानंतर आता हे निर्बंध वाढवून 31 मे पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन; पाहा काय सुरू काय बंद...

राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. काही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी सर्वांनीच मागणी होती. त्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यापूर्वी ब्रेक द चेन अंतर्गत लागू असलेले कठोर निर्बंध या कालावधीत सुद्धा लागू असणार आहेत.

लॉक डाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर पोलिसांकडून कारवाई

लॉकडाऊन लागू केल्याने मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांत कोरोना रुग्ण वाढीला ब्रेक लागला आणि रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील इतर भागांतील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हे कठोर निर्बंध आणखी 15 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला; पाहा नियम...

चौथ्यांदा वाढवले कठोर निर्बंध
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने 5 एप्रिल 2021 रोजी ब्रेक द चेन अंतर्गत कठोर नियम लागू केले. त्यानंतर सुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून 1 मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. यानंतर पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने हे निर्बंध 15 मे 2021 पर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊन बाबत अशी आहे शासनाची नवीन नियमावली!

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

चॅलेंज स्वीकारणं हे माझ्या रक्तात: अशोक इंदलकर (वरिष्ठ पोलिस निरीक्षक)

पुणे शहरात घरपोच देवगड आंबा हवा असल्यास 9511 827050 व्हॉट्सऍपवर क्रमांकावर संपर्क करा.

Title: maharashtra government increase lockdown till may 31 corona
प्रतिक्रिया (1)
 
Kiran godse
Posted on 13 May, 2021

Loan chya installment baddal pn kahi tari nirnay ghyayla hava Sagale udyog sadhya band ahet

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे