राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक; पाहा कुठल्या जिल्ह्यात काय स्थिती...

रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यात एकूण पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबई: राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने राज्यात एकूण पाच टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांत सर्व सेवा, सुविधा सुरू होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यांत काही निर्बंध लागू असणार आहेत. उद्यापासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.

खासगी हॉस्पिटल्सना दणका, कोविड उपचारासाठी दर जाहीर

आठवड्याला आढावा घेऊन निर्णय
दर आठवड्याला जिल्ह्यांचा आढावा घेणार आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट बघून जिल्ह्यांचे टप्पे बदलण्याचा निर्णय होणार असल्याची माहितीही राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

कुठल्या जिल्ह्यात किती टप्प्यांचा समावेश?

पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे - सर्व 18 जिल्हे अनलॉकचा निर्णय
दुसर्‍या टप्प्यात 5 जिल्हे
तिसऱ्या टप्प्यात 10 जिल्हे
चौथ्या टप्प्यात 2 जिल्ह्यांचा समावेश
असे आहेत 5 टप्पे

पुणे अनलॉकच्या दिशेने; पाहा काय सुरू आणि काय बंद...

पहिला टप्पा - ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन २५ टक्के बेड आत आहे तिथ लांकडाऊन राहणार नाही. मॉल्स हॉटेल्स दुकाणे वेळेचे बंधन नाही.
खालील सेवांना परवानगी
पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालय पूर्ण सुरू होतील, चित्रपट गृह सुरू होतील.
जिम, सलून सुरू राहणार
बस 100 टक्के क्षमतेने
आंतरजिल्हा प्रवास मुभा राहणार
ई कॉमर्स सेवा सुरू राहणार
गार्डन, वॉकिंग ट्रॅकला परवानगी
थिएटर सुरू होणार
चित्रपट शूटिंगला परवानगी
पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांत जमावबंदी नाही

महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवला; काय सुरू, काय बंद पाहा...

अनलॉक झालेले राज्यातील 18 जिल्हे
भंडारा
बुलढाणा
चंदपूर
धुळे
गडचिरोली
गोंदिया
वर्धा
जालना
लातूर
नागपूर
नांदेड
नाशिक
परभणी
ठाणे
वर्धा
वाशीम
यवतमाळ

दुसरा टप्पा - दुसऱ्या टप्प्यात एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, अहमदनगर, अमरावती, हिंगोली, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील या जिल्ह्यांत काही निर्बंध अंशत: शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या डॉक्टरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

दुसऱ्या टप्प्यात खालील सेवांना परवानगी

50 टक्के हॉटेल सुरू
मॉल्स, चित्रपटगृह - 50 टक्के क्षमतेने सुरू
मुंबई लेवल 2 मध्ये असल्याने लोकल बंदच राहणार
सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के खुले
लग्न सोहळा मॅरेज हॉल 50 टक्के आणि जास्तीत 100 लोक उपस्थितीत
अंत्यविधी सोहळा सगळे उपस्थितीत राहता येईल
मिटिंग आणि निवडणूक 50 टक्के उपस्थितीत
बांधकाम, कृषी काम खुली
जीम सलुन ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरू
शासकीय बस आसाम क्षमता 100 टक्के सुरू
जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथ रेड झोन यात जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल

...तर तुम्हाला टोलमाफ; जाणून घ्या नव्या गाइडलाइन्स

दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे
अहमदनगर
अमरावती
हिंगोली
मुंबई शहर, मुंबई उपनगर
नंदुरबार

18 ते 44 वयोगटातील नागरिकांना घेता येणार लस; कशी ती पाहा...

तिसरा टप्पा - तिसऱ्या टप्प्यात एकूण 10 जिल्ह्यांचा समावेश आहे.

तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे
अकोला
बीड
पालघर
रत्नागिरी
सांगली
सातारा
सिंधुदुर्ग
गडचिरोली
उस्मानाबाद

तिसऱ्या टप्प्यात काय सुरू
अत्याआवश्यक दुकाने सुरू राहणार
सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने, सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील
मॉल्स थेटर्स सर्व बंद राहतील
सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्यंत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार बंद राहतील
लोकल बंद राहतील
मांर्निंक वॉक, मैदाने, सायकलिंग पाहटे 5 ते सकाळी 9 मुभा
50 टक्के खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू
आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार
स्टुडिओत चित्रीकरण परवानगी सोमवार ते शनिवार करता येईल
मनोरंजन कार्यक्रम 50 टक्के दुपारी 2 पर्संत खुले असणार सोमवार ते शुक्रवार
लग्नसोहळ्याला 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोक मुभा असतील
बांधकाम दुपारी दोन पर्संत मुभा
कृषी सर्व कामे मुभा
ई कॉमर्स सेवा दुपारी 2 पर्यंत सुरू
जमावबंदी संचारबंदी कायम राहील

कोरोनाच्या काळात मोफत धान्य योजनेमध्ये झालाय मोठा घोटाळा?

चौथ्या टप्प्यात दोन जिल्ह्यांचा समावेश
पुणे
रायगड

पाचवा टप्पा - उर्वरित सर्व जिल्ह्यांचा पाचव्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. पाचव्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. तेथे निर्बंध कठोर असणार आहेत.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: maharashtra government declared unlock in 5 levels see what
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे