पादचाऱ्याच्या हातातील मोबाईल हिसकावून फरार... आरोपींना अटक

कोंढवा पोलिसांची कामगिरी

मोटारसायकलवरुन आलेले तिघे रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावून फरार झाले. कोंढवा परिसरातील हांडेवाडी भागात हा प्रकार घडला.

कोंढवा : मोटारसायकलवरुन आलेले तिघे रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावून फरार झाले. कोंढवा परिसरातील हांडेवाडी भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांना आरोपींना शोधण्यात यश आले असून, आरोपींकडून १ लाख २३ हजार रूपये किमतीचे १२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.    

हांडेवाडी भागात पायी चालणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावण्याची घटना घडली होती. त्याअनुषंगाने कोंढवा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेण्याचा आदेश पोलिस आयुक्त रितेशकुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उप आयुक्त परिमंडळ ५ विक्रांत देखमुख, सहायक पोलिस आयुक्त  वानवडी विभाग पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे व पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले यांनी दिला होता. 

वरिष्ठांच्या आदेशानुसार, तपासपथक अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे, तपास पथक अंमलदार अमोल हिरवे, महेश वाघमारे, गणेश चिंचकर, राहुल रासगे, अभिजीत रत्नपारखी, राहुल थोरात, सुहास मोरे, विकास मरगळे हे आरोपींचा शोध घेत होते. स्टाफचा गट करुन उंड्री, महंमदवाडी भागात पेट्रोलिंग करत होते. 

या वेळी पोलिस अंमलदार महेश वाघमारे, गणेश चिंचकर, राहुल रासगे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, फ्रेब्रुवारी महिन्यामध्ये हांडे लॉन्स येथे पायी जाणाऱ्या व्यक्तीला तीन व्यक्तींनी त्यांच्याकडील करिझ्मा मोटारसायकलवरुन येवून त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरी केली. तेच चोरटे करिझ्मा मोटारसायकलवरुन दिल्ली पब्लिक स्कूलच्या जवळ अंधारात त्यांची गाडी पार्क करुन थांबलेले आहेत. ते पुन्हा गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत. 

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने दिल्ली पब्लिक स्कूल येथून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. उमर सलिम शेख (वय १९ वर्षे, रा. आदर्शनगर, तिरंगा चौक, उरळी देवाची, वैष्णवी सिटी, पुणे),  कदिर ईकबाल शेख (वय १९ वर्षे, रा. वैष्णवी सिटीच्या बाजूला, शिवाजी चौकाजवळ, पत्र्याचे घर उरुळी देवाची, पुणे), विधीसंघर्षग्रस्त बालक अशी नावे आहेत. याबाबत चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागले. 

संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी मोबाईल हिसकावल्याचा गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपींना अटक करुन त्यांची पोलिस कस्टडी रिमांड घेवून तपास करुन घरझडती घेतली असता, त्यांच्या घरातून जबरी चोरी केलेले एकूण एक लाख २३ हजार रूपये किमतीचे १२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मोबाईल मालकांचा शोध घेतला असता, त्यांनीही त्यांचे मोबाईल हिसकावून चोरी केल्याचे सांगितले.

Title: maharashtra crime pune Absconded after snatching the mobile
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे