बापरे! शेतकऱ्यानेच कापले शेतकऱ्याचे नाक... कारण ऐकून व्हाल हैराण!
शेतातील काम आटोपून घरी जात असताना, जनावरे चारण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याने लोखंडी कोयत्याने वार करून दुसऱ्या शेतकऱ्याचे नाक कापल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.धाराशिव : शेतातील काम आटोपून घरी जात असताना, जनावरे चारण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याने लोखंडी कोयत्याने वार करून दुसऱ्या शेतकऱ्याचे नाक कापल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आंदोरा येथील शेतकरी अनंत व्यंकटराव तांबारे (वय ६३) हे १० मार्च रोजी आपल्या शेतातून (गट नं. ४४१) घराकडे जात असताना त्यांच्या शेताशेजारीच उभे असलेले विनोद बळीराम जाधव (ता. कळंब, रा. आंदोरा) हे शेतकरी व्यंकटराव यांच्या जवळ जाऊन त्यांना म्हणाले की, तू माझ्या जनावरांना तूझ्या शेतात का चरू देत नाहीस? असे म्हणून विनोद जाधव यांनी त्यांच्या हातातील लोखंडी कोयत्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने नाकावर वार करून नाक कापले आणि डाव्या बाजूच्या मांडीवर सुद्धा वार करून अनंत तांबारे यांना जखमी केले.
त्यानंतर व्यंकटराव तांबारे यांनी आरडाओरडा केल्यावर त्यांचा मुलगा विजयसिंह तांबारे यांनी पळत येऊन व्यंकटराव यांना उचलून दवाखान्यात दाखल केले. १० मार्च रोजी तांबारे हे त्यांच्या मुलासह शेतातील काम आटोपून घराकडे जात असताना त्यांचा मुलगा लघुशंकेला गेल्यावर तांबारे हे शेताच्या कडेला लावलेल्या मोटार सायकलजवळ जाऊन त्यांच्या मुलाची वाट बघत थांबलेले होते. शेताशेजारी विनोद बळीराम जाधव यांनी, तू माझी जनावरे शेतात चारू का देत नाही, असे म्हणत जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयत्याने नाकावर मारून माझे नाक कापले आणि डाव्या मांडीवरही कोयत्याने मारले अन् मला जखमी केले. अशा मजकुराच्या अनंत तांबारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विनोद जाधव यांच्या विरुद्ध भा.दं.सं. कलम ३०७ आणि ३२४ अंतर्गत कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.