खळबळजनक! चंद्रपुरात पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या...काय आहे नेमके कारण...

शुक्रवारी सकाळी या कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली.

चंद्रपूर : येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. सुशील कुंबलवार (वय ४३) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते राजुरा पोलिस स्थानकात कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी या कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. 

दरम्यान, ही आत्महत्या मानसिक त्रासातून केल्याची परिसरात चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आत्महत्याग्रस्त पोलिसाच्या घरी जाऊन सविस्तर चौकशी केली. 

सुशील कुंबलवार हे राजुरा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी शुक्रवारी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मानसिक त्रासातून त्यांनी आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात आहे.

ही दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सुशील कुंबलवार यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली.

Title: maharashtra crime chandrapur Police Committed Suicide
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे