चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढल्या... 'ती' याचिका न्यायालयाने फेटाळली!
चित्रा वाघ यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत असून, त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी एका प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात ५० लाख रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्या दाव्याविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. हा चित्रा वाघ यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत असून, त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चित्रा वाघ यांची याचिका फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्याविरोधात चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयानं चित्रा वाघ यांची याचिका फेटाळून आवली आहे. हा चित्रा वाघ यांच्यासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.
चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्या विरोधात एका तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप केलेला. विशेष म्हणजे शेख यांच्या विरोधात या प्रकरणात सिडको पोलीस ठाण्यात २८ डिसेंबर २०२० रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला. एका २९ वर्षीय तरुणीने शेख यांच्याविरोधात फिर्याद नोंदवली होती. मेहबूब शेख यांनी नोकरीचं आमिष दाखवून मुंबईला नेणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुंबईला नेण्याच्या नावानं घेऊन गेलं असताना कारमध्ये अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला होता. याशिवाय शेख यांना विरोध केला असतान तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं होतं.
संबंधित प्रकरणी चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्याविरोधात हल्लाबोल केलेला. वाघ यांनी पत्रकार परिषद घेत शेख यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. पण त्यानंतर वेगळंच काहीतरी घडलं. पीडित तरुणीने आरोपांपासून घुमजाव केला. त्यामुळे चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. यानंतर मेहबूब शेख यांनी मुंबई हायकोर्टात चित्रा वाघ यांच्या विरोधात ५० लाखांचा अब्रूनुकसावनीचा दावा केला. या विरोधात चित्रा वाघ यांनी हायकोर्टात अपील केलेली. पण त्यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे.