दहावीचा निकाल 'या' वेबसाईटवरून पाहा सोप्या पद्धतीने...

दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी दिली.

मुंबई: दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करण्यात आला आहे. हाच निकाल आज (शुक्रवार) ऑनलाईन जाहीर होणार आहे.

दहावीच्या निकालाबाबात शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती; असा पाहा निकाल...

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 2021 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येईल.

दहावीचा निकाल पाहा असा...
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in जा

SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा.

या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा सीट नंबर टाइप करा. सीट नंबर स्पेसशिवाय टाइप करा.

आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका.

लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

तुम्हाला तो निकाल डाऊनलोड करता येणार आहे. विद्यार्थी संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउटही काढू शकणार आहेत.

दहावीच्या निकालासंदर्भात मोठी बातमी...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: maharashtra 10th result maharashtra ssc result 2021 board re