युवकाची डोळ्यात मिरची पावडर फेकून केली हत्या...

प्रथम त्याच्या डोळ्यावर मिरची पावडर फेकण्यात आली. यावेळी आकाशला काही दिसेनासे झाले. ही संधी साधत त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले.

इंदौर (मध्य प्रदेश): डोळ्यात मिरची फेकून नंतर चाकूने वार करून युवकाचा खून केल्याची घटना येथे घडली आहे.  पूर्ववैमनस्यातून हा खून केल्याचे पोलिसांच्या  प्राथमिक तापसातून पुढे आले आहे.

बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बनावट नोटा जप्त

बाणगंगा पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. आतापर्यंत झालेल्या तपासात आकाश असे मृत युवकाचे नाव असून तो विवाहित आहे. तसेच हल्ला झाला त्यावेळी तो पत्नीला सोडून येत होता.  यावेळी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. प्रथम त्याच्या डोळ्यावर मिरची पावडर  फेकण्यात आली. यावेळी आकाशला काही दिसेनासे झाले. ही संधी साधत त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात त्याचा  जागीच  मृत्यू झाला. या घटनेने मध्य प्रदेशमधील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नियोजनपूर्वक हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत असून, बाणगंगा पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: madhya pradesh crime news youth murder case at indore
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे