एक-दोन नव्हे तर तिने केली तब्बल ३० लग्ने; धक्कादायक माहिती उघड...

एका युवतीने एक, दोन नव्हे तर तब्बल 30 जणांसोबत लग्न करून त्यांची फसवणूक केली आहे.

जबलपूर (मध्य प्रदेश): एका युवतीने एक, दोन नव्हे तर तब्बल 30 जणांसोबत लग्न करून त्यांची फसवणूक केली आहे. लग्नाच्या नावाखाली 5 लाख घेऊन फरार झालेल्या या युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तिला डुंगरपूर जिल्ह्यातील सागवाडा पोलिसांनी अटक केली आहे. सीता चौधरी असे तिचे खरे नाव आहे. रीना ठाकूर या नावाने तिने 30 लग्न केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली.

बापरे! नवरदेवाने मोबाईलवर मेसेज वाचून मंडपातूनच ठोकली धूम...

सागवाडा पोलिस निरीक्षक सुरेंद्र सिंह सोलंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, '12 डिसेंबर 2021 ला जोधपुरा येथील रहिवासी प्रकाशचंद्र भट्ट यांनी एक तक्रार दाखल केली होती. भट्ट यांनी सांगितले की, जुलै 2021 मध्ये एजंट परेश जैन याने  जबलपूर येथील रहिवासी रीना ठाकूर सोबत त्याचे लग्न लावून दिले होते. याबदल्यात रमेश आणि रीनाने त्याच्याकडून 5 लाख रुपये घेतले होते. लग्नानंतर 7 दिवस सासरी राहिल्यानंतर रीना त्याच्यासोबत जबलपूर येथे गेली. परत येताना रीनाने दुसऱ्या लोकांना सोबत घेऊन त्याला मारहाणही केली आणि आपल्या साथीदारांसह ती पळून गेली होती.

प्रेम! अक्षदा पडल्या अन् प्रियकराने फिल्मी स्टाईलने एन्ट्री केली...

पोलिस तपासादरम्यान ती जबलपूर येथे गुड्डी उर्फ पूजा बर्मनच्या सोबत काम करत असून, गुड्डीने लुटारू नववधूंची टोळी चालवली आहे. तिने काही मुलींची बनावट नावे, पत्त्यासह आधारकार्ड आणि अन्य कागदपत्र तयार करुन ठेवले आहे. अनेक राज्यांमध्ये ती एजंटच्या माध्यमातून बनावट लग्न करवून त्यांच्यापासून पैसे आणि सोने, चांदीचे दागिने घेत होती. त्यानंतर ती फरार होत होती. सीता चौधरीदेखील अधिक काळापासून तिच्यासोबत राहत होती.

हनिमूनच्या रात्री पत्नीजवळ गेला असता बसला मोठा धक्का...

लुटेरी दुल्हन! तरुणीने एक, दोन नव्हे तर तब्बल 30 लग्न केली; 'अशी' अडकवायची जाळ्यात अन्...

प्रियकराने हनिमूनच्या रात्रीच पाठवला तिच्या नवऱया व्हिडिओ...

पोलिसांनी तपासादरम्यान, पूजा बर्मनचा नंबर काढला. यानंतर कॉन्स्टेबल भानुप्रतापने आपला फोटो पाठवून लग्न करण्याबाबत तिला सांगितले. लग्नासाठी मुलगी दाखवायला पाच हजार रुपये मागण्यात आले. त्यानंतर पूजाने कॉन्स्टेबलला 8 ते 10 मुलींचे फोटो पाठवले. त्यात रीनाचाही फोटोही होता. पोलिसांनी रीनाला लगेचच ओळखले. यानंतर एक सापळा रचत रीना पसंत असल्याचे सांगत तिच्यासोबत लग्न करण्याचे सांगितले.

बापरे! एक, दोन नव्हे तर किती लग्नं केली पाहाच...

पूजाने कॉन्स्टेबलला समदडिया मॉलजवळ एडव्हान्समध्ये 50 हजार रुपये घेण्याबाबत सांगितले. यानंतर कॉन्स्टेबल भानुप्रताप वर बनला आणि त्याच्यासोबत कॉन्स्टेबल भूपेंद्र सिंह आणि वीरेंद्र सिंह त्याचे मित्र बनून गेले. तिकडे पूजा रीना ठाकूरला घेऊन आली. तिथे तिने तिचे नाव काजल चौधरी असल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांना इशारा मिळताच महिला पोलिस पथकही तिथे पोहोचले. यानंतर पोलिसांनी रीना चौधरी उर्फ सीता चौधरी उर्फ काजल चौधरी हिला अटक केली. आतापर्यंत तिने 30 लग्न केल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक खुलासा! महिलेचे हे पाचवे लग्न होते तरीही...

धक्कादायक! नववधू निघाली दोन मुलांची आई अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: madhya pradesh crime news women arrested for 30 marriage and
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे