हनिमूनदरम्यान नवऱयाकडून घडली धक्कादायक घटना...

लग्नाला चार दिवस उलटून गेले असतानाही पत्नी जवळ येऊ देत नव्हती आणि शारीरिक संबंध ठेवण्यासही मनाई करत होती.

भोपाळ (मध्य प्रदेश): विवाह सोहळा पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनदरम्यान नवरीने शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे चिडलेल्या नवऱयाने नवरीचा खून केल्याची धक्कादायक घटना रतलाममध्ये घडली आहे. लग्नानंतर अवघ्या पाचच दिवसात नवरीला जगाचा निरोप घ्यावा लागला आहे.

वहिनी आणि दिराने रात्रीच्या वेळी उचलले धक्कादायक पाऊल...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अंजली हिचे लग्न शिवगढच्या दिलीपसोबत १५ जून रोजी झाले होते. लग्नाच्या पाच दिवसांनंतर दिलीप पत्नीला घेऊन जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. अंजली बाथरूममध्ये पडल्याचे त्याने डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर अंजलीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. दरम्यान, हे प्रकरण पोलिसात गेले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. १० जुलै रोजी अहवाल हाती आला आणि त्यानुसार अंजलीचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाला असल्याचे उघड झाले. 

धक्कादायक! मालकाच्या मुलीसोबत असलेल्या प्रेमातून घडले दुहेरी हत्याकांड

शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर पोलिसांनी दिलीपची पुन्हा पुन्हा चौकशी केली. चौकशीदरम्यान दिलीपने सांगितले की, 'लग्नाला चार दिवस उलटून गेले  असतानाही पत्नी जवळ येऊ देत नव्हती आणि शारीरिक संबंध ठेवण्यासही मनाई करत होती. जेव्हाही तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा ती नकार देत होती. याचाच राग त्याच्या मनात होता. पत्नीचे नाक, तोंड आणि गळा दाबून हत्या केली.' दरम्यान, पोलिसांनी दिलीपला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

हनिमूनच्या रात्री जाग आल्यावर नवरदेवाला बसला धक्का...

प्रेमविवाहानंतर हनिमूनच्या रात्री खोलीत आढळले बेशुद्धावस्थेत...

हनिमूनच्या रात्रीच नवरदेवाला समजली धक्कादायक माहिती...

हनिमूनच्या रात्री नवरा झोपल्यावर नवरीचे कृत्य सीसीटीव्हीत कैद...

हनिमूनच्या रात्री नवरीच्या पोटात लागले दुखायला; मग...

हनिमूनच्यावेळी पत्नीचे काढलेले फोटो व्हायरल अन्...

हनिमूनसाठी खोलीत गेल्यावर दोघांची जोरदार हाणामारी...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: madhya pradesh crime news honeymoon time bride and groom
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे