क्रूर घटना! एकाच कुटुंबातील ५ जणांना ट्रकने चिरडले...

लंडनच्या औंटारियो शहरात घडली घडली आहे. या घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी एका युवकाला मॉलच्या परिसरातून अटक केली आहे.

टोरंटो (कॅनडा): पाकिस्तानी मुस्लीम कुटुंबातील पाच जणांना जाणूनबुजून ट्रकखाली चिरडल्यामुळे जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.

पाकिस्तानमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, 30 जणांचा मृत्यू

मुस्लीम कुटुंबाच्या हत्येनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका ट्रक ड्रायव्हरने मुस्लीम असल्यामुळे एका कुटुंबाला लक्ष्य केले. लंडनच्या औंटारियो शहरात रविवारी (ता. 6) रात्री घडली आहे. या घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी एका युवकाला मॉलच्या परिसरातून अटक केली आहे. एका वळणावर ट्रकचालकाने पीडित कुटुंबाला रस्त्यावर चिरडले.

बापरे! 'वजनदार' पत्नी अंगावर बसल्याने पतीचा गुदमरून मृत्यू

शहराचे महापौर एड होल्डर म्हणाले, 'मुस्लिमांविरोधात सामूहिक हत्या केल्याची घटना आहे. मुस्लिमांबद्दल द्वेष भावनेतून आरोपीने क्रूर घटना केली. या अपघातात मृत झालेल्यांमध्ये मूळचे पाकिस्तानी असलेले कॅनडियन नागरिक सलमान अफजल, त्यांची पत्नी मदीहा, मुलगी यमूना आणि ७४ वर्षाची आजी आहे. त्यांचे नाव समोर आले नाही. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या मुलाचं नाव फैयाज आहे.'

Video: पाकमध्ये पोलिस आणि नौदल कर्मचाऱ्य़ांमध्ये दे दणा दण...

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 'या संतापजनक हल्ल्याबद्दल मी लंडनच्या महापौरांची चर्चा केली आहे. इस्लामोफोबिया विरोधात लढण्यासाठी प्रत्येक साधनांचा वापर केला जाईल. देशभरातील मुस्लिमांना सांगू इच्छितो आम्ही तुमच्यासोबत उभे आहोत. आमच्या समाजात इस्लामोफोबियासाठी कुठेही जागा नाही. अशा घृणास्पद प्रकार बंद व्हायलाच हवेत.'

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: london crime news muslim family killed truck driver canada
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे