सलमान खान मैत्रिणीसोबत लोणावळ्याला फिरायला गेला अन्...
सलमान आणि त्याची मैत्रिण रविवारी रात्री लोणावळा पुलाच्या पुढे फिरायला गेले होते. यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवला.लोणावळा: लोणावळाच्या सहारा पूल भागात फिरायला गेलेल्या एका युवक-युवतीला धारदार शस्त्राचा धाक दाखवत लुटल्याची घटना रविवारी (ता. २२) रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. याबाबत सलमान उस्मान खान (वय 19, रा. टेबल चाळ, जी वार्ड लोणावळा) याने शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान आणि त्याची मैत्रिण रविवारी रात्री लोणावळा पुलाच्या पुढे फिरायला गेले होते. यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवला. सलमान खान याच्या गळ्याला चाकू लावून त्याच्या जवळील आयफोन, त्याच्या मैत्रिणीकडील सोन्याची चैन, चांदीची अंगटी असा 1 लाख 12 हजार 400 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. यावेळी सलमान याच्या गळ्याला आरोपींनी चाकू लावून त्यांना लुटत असताना झालेल्या झटापटीत तो जखमी झाला आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरोधात भादवि कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे करत आहेत.
लोणावळा शहरातील वेश्या व्यवसायाचा पर्दापाश; महिलांची सुटका...
लोणावळा येथे सत्यसाई कार्तीक यांची मटक्यावर धडाकेबाज कारवाई...
लोणावळा येथे नाताळ व 31 डिसेंबरच्या अनुषंगाने खबरदारीच्या सूचना...
लोणावळा पोलिस स्टेशन हद्दीतील खाजगी बंगलेधारकांना बैठकीत केल्या सुचना...
लोणावळा येथे सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची पहाटेच्या सुमारास कारवाई...
लोणावळ्यातील अवैध धंद्यांची माहिती द्या: सत्य साई कार्तिक
सिंहगड, खडकवासला, लोणावळा येथे गर्दी करणाऱ्यांवर कारवाई...
लोणावळ्यातील डॉक्टरच्या बंगल्यावर दरोडा; लाखो रुपये घेऊन पसार...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.