लर्निंग लायसन्स मिळवा घरबसल्या; अशी असेल प्रक्रिया...

घरबसल्‍या शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्‍स) चाचणीचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने ‘परिवहन’ या संकेतस्‍थळावर आधार क्रमांकाची नोंद करावी.

मुंबई : घर बसल्या शिकाऊ वाहन चालक परवान्यासाठी  चाचणी तसेच नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी वितरकाकडून ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी परिवहन विभागातर्फे ‘सारथी 4.0’ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे ई-लोकार्पण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते आज (सोमवार) करण्यात आले.

पुणे शहरात निर्बंध आणखी शिथिल, पाहा नवी नियमावली...

यासाठी आपला आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. यामुळे आता शिकाऊ वाहनचालक परवाना, तसेच नवीन वाहनांची नोंदणी करणे अधिक जलद व सोयीस्कर होणार आहे. आगामी काळातही, राज्याच्या परिवहन विभागाच्या ज्या शासकीय सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देता येईल, त्या उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे, परिवहन विभागाच्या सेवा जास्तीत जास्त प्रमाणात लोकाभिमुख व पारदर्शक होणार आहे, असे मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वात मोठी घोषणा...

राज्यात दरवर्षी सुमारे 15 लाखापेक्षा जास्त शिकाऊ परवाने देण्यात येतात तसेच 20 लाखाहून अधिक नवीन वाहनांची नोंदणी होते. या कामी नागरिकांचा अंदाजे 100 कोटी रुपयांचा खर्च होतो. आता या सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिल्याने खर्चात बचत  होऊन नागरिकांचा वेळ व श्रमही वाचणार आहे. तसेच  हे काम करणाऱ्या अंदाजे 200 अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत झाल्याने विभागाच्या कामाची दर्जोन्नती करणेही यातून शक्य होईल.

रात्रच नव्हे तर दिवस देखील वैऱ्याचा: मुख्यमंत्री

शिकाऊ वाहन चालक परवाना आणि नवीन खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन परिवहन विभागाने आज जनहिताचे एक महत्वाकांक्षी पाऊल टाकले असून, भविष्यातही शासकीय विभागांना ज्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देणे शक्य आहे त्या उपलब्ध करून देण्यासाठी ई गव्हर्नन्सवर आधारित नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

“सारथी 4.0” या अद्ययावत प्रणालीअंतर्गत आधार क्रमांकांशी संलग्न असलेल्या ऑनलाईन शिकाऊ वाहन चालक परवाना तसेच वाहन नोंदणीच्या ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

अनलॉकबाबत नियमावली जाहीर, कोणता जिल्हा कधी पाहा...

शिकाऊ वाहन परवाना मिळवण्यासाठी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही. नवीन वाहन नोंदणीकरिता यापूर्वी वाहनांची तपासणी मोटार वाहन निरीक्षकांमार्फत करण्यात येत होती आता अशा पद्धतीने वाहन तपासण्याची आवश्यकता काढून टाकण्यात आली असून, यापुढे नवीन वाहनांची वितरकाच्या स्तरावर तत्काळ नोंदणी होईल. वाहन वितरकांमार्फत सर्व कागदपत्रे डीएससी (डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट) चा उपयोग करुन ई स्वाक्षरी पद्धतीने तयार करण्यात येतील त्यामुळे कार्यालयात वाहन अथवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. वाहन वितरकांनी कर व शुल्क भरल्याक्षणी वाहन क्रमांक जारी होणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भात नियमावली जाहीर...

केंद्र शासनाने एका अधिसूचनेद्वारे आधार क्रमांकाचा वापर करून फेसलेस सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे सारथी या प्रणालीतही बदल करणअयात आले आहेत. ऑनलाइन लर्निंग लायसनची प्रक्रिया करताना अर्जदाराला रस्ता सुरक्षा विषयक व्हिडिओ पहावा लागेल. त्यानंतर काही प्रश्न येतील. त्यातील किमान ६० टक्के उत्तरे अचूक उत्तर दिल्यास परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या उमेदवाराला घरबसल्या लायसन्सची प्रिंट मिळणार आहे.

...तर तुम्हाला टोलमाफ; जाणून घ्या नव्या गाइडलाइन्स

त्याचप्रमाणे नमुना एक (अ ) मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा डॉक्टरांमार्फत ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुविधा राष्ट्रीय सूचना केंद्र मार्फत विकसित करण्यात आली असून याद्वारे अर्जदारांची तपासणी संबंधित डॉक्टरमार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर नमुना एक (अ) अपलोड करण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक डॉक्टरने परिवहन संकेतस्थळामार्फत प्रमाणपत्र सादर करायचे आहे. त्यांची कागदपत्रांची पडताळणी करून परिवहन कार्यालयार्फत युजर आयडी दिला जाणार आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, किंवा आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक नाही, त्यांना पारंपरिक पद्धतीने लर्निंग लायसन काढावे लागेल.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांना घेता येणार लस; कशी ती पाहा...

अशी असेल लायसन्‍सची प्रक्रिया
घरबसल्‍या शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्‍स) चाचणीचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने ‘परिवहन’ या संकेतस्‍थळावर आधार क्रमांकाची नोंद करावी. त्‍यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता व स्‍वाक्षरी, आधार डेटा बेसमधून ‘परिवहन’ या संकेतस्‍थळावर येईल. यामुळे अर्जदाराची ओळख व पत्त्याची वेगळी खातरजमा करण्याची आवश्‍यकता नसेल. नंतर अर्जदार रस्‍ता सुरक्षाविषयक व्‍हिडिओ पाहून घरबसल्‍या शिकाऊ अनुज्ञप्तीची चाचणी देतील. विचारलेल्‍या प्रश्‍नांचे ६० टक्‍के अचूक उत्तर दिल्‍यास चाचणी उत्तीर्ण ठरविले जातील. अशा अर्जदारांना घरबसल्‍या शिकाऊ अनुज्ञप्तीची प्रिंट प्राप्त होईल. यामुळे नागरिकांना कार्यालयात येण्याची आवश्‍यकता नाही. दरम्‍यान, ज्‍या अर्जदारांकडे आधार क्रमांक नाही किंवा या सुविधेचा लाभ घ्यायचा नाही, अशा अर्जदारांना पूर्वीप्रमाणे ‘परिवहन’ या संकेतस्‍थळावरून ऑनलाइन अर्ज व आवश्‍यक प्रक्रिया राबवून स्‍लॉट बुकिंग करता येईल.

कोरोनाच्या काळात मोफत धान्य योजनेमध्ये झालाय मोठा घोटाळा?

वैद्यकीय प्रमाणपत्र ऑनलाइनच
वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्‍टरांमार्फत ऑनलाइन देण्याची सुविधा विकसित केली आहे. याद्वारे अर्जदाराची तपासणी संबंधित डॉक्‍टरांमार्फत करत प्रमाणपत्र अपलोड केले जाईल. यासाठी प्रत्‍येक डॉक्‍टरांनी परिवहन संकेतस्‍थळामार्फत अर्ज करायचे असून, त्‍यांनी कागदपत्रांची पडताळणी करून परिवहन कार्यालयामार्फत युजर आयडी घ्यायचे आहेत.

असा करा ऑनलाईन अर्ज

    या सेवेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने परिवहन या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना आधार क्रमांकाची नोंद करणे आवश्यक आहे.

    त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता, स्वाक्षरी आदी तपशील आधार डेटाबेसमधून परिवहन या संकेतस्थळावर येईल.

    त्यामुळे अर्जदाराची किंवा त्याच्या राहत असलेल्या पत्त्याची वेगळी खातरजमा करावी लागणार नाही

    शाळा सोडण्याचा दाखला व आवश्यक कागदपत्रे त्यावर अपलोड करावी लागणार आहेत.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: learning driving license online test rto cm uddhav thackeray