पोलिस खात्यातील कर्तव्यदक्ष संवेदनशील अधिकारी; पद्माकर घनवट

सातारा पोलिस दलात जबरदस्त कार्याचा ठसा उमटविलेल्या घनवट यांच्या निरोप समारंभावेळी पोलिस ठाण्यासमोर अनेक नागरिकांची गर्दी होती.त्या गर्दीतील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रु अन मनात आदराची,आपुलकीची भावना होती.प्रत्येकजण भावनाविवश झालेला होता.हे केवळ आदर,आत्मियता अन प्रेमापोटीच मिळाले होते.हि खरी कामाची पोचपावती होती.

तेव्हा सारे जमलेले होते त्या एका अधिका-याच्या निरोप समारंभासाठी.उपस्थित असलेल्या तालुक्यातील प्रत्येकाच्या डोळ्यात होते ते केवळ अश्रुच.सारेच गेलेले होते भारावुन..ते केवळ असलेल्या प्रेमापोटी... असा जनतेचा वर्दीतील दडलेला तो पोलिस अधिकारी म्हणजेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट...

प्रेरणादायी यशोगाथा
हीच त्यांच्या पोलिस खात्यात प्रामाणिकपणे केलेल्या कामाची खरी पोचपावती होती.महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेले व विविध भागात कामाच्या माध्यमातुन ठसा उमटविलेले कर्तव्यदक्ष अधिकारी पद्माकर घनवट यांची पोलिस खात्यात वेगळीच छान असुन सातारा जिल्हयात "देवमाणुस" अशीही ओळख आहे.लहानपणापासुन संघर्ष करत पोलिस खात्यात उत्कृष्ट कामाचा ठसा उमटवित असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांची हि प्रेरणादायी यशोगाथा...

लहानपणापासुन वर्दीचे आकर्षण
पुणे जिल्हयातील पाबळ या गावात जन्म झालेल्या पद्माकर घनवट यांचे प्राथमिक शिक्षण वाडेगव्हाण(ता.पारनेर,जि.अहमदनगर) येथे झाले.त्यानंतर गावापासुन काही अंतरावर शिक्षणाची चांगली सोय असलेल्या शिरुर शहरातील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात अकरावीपासुन ते एम.कॉम पर्यंत चे उच्च शिक्षण घनवट यांनी पुर्ण केले.शिक्षण सुरु असतानाच घनवट यांना लहाणपणापासुनच खाकी वर्दीचं आकर्षण असल्याने ते स्वप्न साकारण्यासाठी त्यांची कठोर मेहनतीची तयारी अन जिद्द होती.हे स्वप्न कधीच स्वस्थ बसु देत नव्हते.त्यामुळे महाविद्यालयापासुनच त्यांनी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास सुरु केला अन पहिल्याच प्रयत्नात सर्व परिक्षा पास होत सन १९८७ मध्ये फौजदार पदाचे स्वप्न सत्यात उतरविले.

मुंबईत कामाचा चांगला अनुभव
महाराष्ट्र पोलिस खात्यात सन १९८८ मध्ये भरती झाल्यानंतर ग्रामीण भागातुन थेट कुठलाही अनुभव नसलेल्या मुंबई शहरात आग्रीपाडा पोलिस स्टेशनला घनवट यांची पोलिस उपनिरीक्षक म्हणुन नेमणुक झाली.या ठिकाणी कामाचा अनुभव गेल्यानंतर देवनार पोलिस स्टेशनला बदली झाली.येथेही कामाचा चांगला अनुभव घेता आला.मुंबईत काम करत असताना सन १९९२ सालची उसळलेली दंगल परिस्थितीत काम करण्याचा अनुभव आला.आग्रीपाडा येथे कार्यरत असताना त्या भागात केवळ घनवट यांच्या सतर्कतेमुळे फारशी दंगल उसळली गेली नाही असं ही म्हटलं जातं.या दंगलीत काम करत असताना श्रीकृष्ण आयोगासमोर त्याकाळी साक्ष नोंदवता आली.त्याचबरोबर त्याकाळी मुंबईतील गॅंगवॉर अनुभवता आले.

पोलिस दलात विविध विभागात कामाचा ठसा
मुंबई मायानगरीत कामांचा चांगला अनुभव गाठीशी घेत कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर पुणे शहर पोलिस दलात बंडगार्डन पोलिस स्टेशनला नेमणुक झाली.पुणे शहरात कामाचा ठसा उमटवित असताना स्पेशल प्रोटेक्शन युनिटला बदली झाल्यानंतर येथेही अनेक व्हीआयपी बंदोबस्त हाताळण्याची जबाबबदारी त्यांनी पार पाडली.पुणे शहरात कामाचा अनुभव घेतल्यानंतर सातारा पोलिस दलात बदली झाली.सातारा शहर,बोरगाव येथे काम करत असताना सहायक पोलिस निरीक्षक पदावर बढती मिळाली.यानंतर औंध,वडुज येथेही काम पाहिले.या ठिकाणी काम केल्यानंर पुणे ग्रामीणला बदली झाली.लोणावळा येथे काम करत असताना महामार्गावर अनेक गुन्हे रोखण्यात यश आले.त्यानंतर नारायणगाव पोलिस स्टेशनला काम करत असताना पोलिस निरीक्षक पदावर काम करण्याची संधी मिळाली.पुणे ग्रामीणला काम करत असताना पुन्हा मुंबई ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम करण्याचा अनुभव घेतला.तेथुन पुणे शहरलाही काही काळ याच विभागात काम केले.दरम्यान नानवीज ट्रेनिंग सेंटर येथेही सुमारे ३ वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली.या ठिकाणी कार्यकाळ पुर्ण केल्यानंतर सातारा जिल्हा पोलिस दलात बदली झाली.

धाडसीवृत्तीमुळेच अनेक महत्वाचे गुन्हे उघडकिस
सुरुवातीपासुनच अंगी धाडसी वृत्ती असल्याने सातारा जिल्हयात गुन्हे अन्वेषन शाखेत काम करण्याची संधी मिळाली.या ठिकाणी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील तसेच पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना अनेक नामचीन गुंडांना त्यांनी सळो कि पळो केले.त्याचबरोबर तडीपारी,मोक्का च्या कारवाया केल्या.हे काम करत असताना जनतेशीही तेवढीच आपुलकी अन जवळीक निर्माण झाली.त्यामुळे अनेक सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविता आल्या.याच ठिकाणी काम करत असताना महाराष्ट्रातील परिचित असलेले डॉ.संतोष पोळ याचं कुकर्म उघडकिस आणत सहा केलेले खुन उघडकिस आणण्यात यश आले.त्याचबरोबर कराड येथील भोंदु बाबाने केलेला दिड वर्षांपुर्वीचा खुन उघडकिस आणण्यात घनवट यांच्या पथकाचे मोठे योगदान आहे.त्याचबरोबर सातारा पोलिस दलात बनावट नोटांची टोळी पकडण्यात सुद्धा महत्वाची भुमिका बजावली आहे.

तेव्हा माञ प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रुंच होते...
सातारा पोलिस दलात कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर सातारा पोलिस दलात जबरदस्त कार्याचा ठसा उमटविलेल्या घनवट यांच्या निरोप समारंभावेळी पोलिस ठाण्यासमोर अनेक नागरिकांची गर्दी होती.त्या गर्दीतील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रु अन मनात आदराची,आपुलकीची भावना होती.प्रत्येकजण भावनाविवश झालेला होता.हे केवळ आदर,आत्मियता अन प्रेमापोटीच मिळाले होते.हि खरी कामाची पोचपावती होती.

पुणे जिल्हयात धडाकेबाज गुन्हे उघडकिस
पुणे ग्रामीण गुन्हे शाखेत दाखल होताच पुणे जिल्हयाची सुञे हाती घेत त्यांनी जिल्हयाच्या गुन्हेगारीचा अभ्यास असल्याने गुंडांच्या मुसक्या आवळणे सुरु केले.या ठिकाणी कार्यरत असताना  लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील दिड वर्षांपुर्वी चोरी गेलेल्या व सामाजिक आस्थेचा विषय असलेल्या एकविरा मातेचा कळस हा चोरीस गेलेला होता.त्यातील आरोपींना शोधुन दिड वर्षे उलटुनही दोन आरोपींना अटक करुन जशाचा तसा एकविरा मातेचा कळस हस्तगत केला.पुणे जिल्ह्यात लग्न समारंभात लावुन वधु-वरांच्या नातेवाईकांचे दागिने लुटणारी बंटी-बबली टोळीस अटक करुन त्यांच्या कडुन १७ गुन्हे उघडकिस आणले त्याशिवाय ९२ तोळे सोने,रोख रक्कम ५,२७,००० रुपये,१० मोबाईल हॅंडसेट व गुन्हयातील वाहन असा मुद्देमाल जप्त केला.दौंड पोलिस स्टेशन हद्दीत गांजाची शेती शोधुन सुमारे ३१ लाख ८२ हजार ५२० किंमतीचा माल जप्त केला.राजगड पोलिस स्टेशन हद्दीत सराफाला लुटुन नेल्याचा प्रकार घडला होता.यावेळी चोरीस गेलेल्या सोन्यापैकी २ किलो ७२० ग्रॅम सोने,१०.३०१ कि.ग्रॅ.चांदी असा एकुण ९१ लाख ८ हजार ६४० रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात यश आले.दौंड पोलिस स्टेशन हद्दीत सोन्याचे व्यापारी  यांच्याकडुन जबरीने सोने चांदी लुटुन नेल्याचा प्रकार घडला होता.याही गुन्हयाचा कसोशीने तपास करत ५ आरोपींना ताब्यात घेत लुटलेले ३ कोटी ६६ लाख २० हजार ६०० रुपये किंमतीचे ९ किलो ६३७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट जप्त करत मुळ मालकाला परत देण्यात आले.वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत सिगारेटने भरलेला कंटेनर चोरी करुन मध्यप्रदेश मध्ये पळुन जाण्याचा प्रयत्न करणा-या आंतरराज्यीय टोळीतील आरोपींना सापळा रचुन अटक करुन सुमारे ४ कोटी ९१ लाख ७९ हजार ५०० फिर्यादीनुसार पकडण्यात आला.त्याचप्रमाणे पुणे जिल्हयातुन अवैध वाहतुक करत असलेला आयशर टेंपो व पिकअप यांस सापळा रचुन अटक करुन सुमारे ३९,००,००० रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.याच बरोबर पुणे ग्रामीण गुन्हे शाखेत कार्यरत असताना खुन,दरोडे,जबरी चोरी यांसारखे अनेक गुन्हे उघडकिस आणण्यात यश आले असुन तडीपारी,,मोक्का अशा चांगल्या कारवाया करण्यात आल्या.

वर्दीतील संवेदनशील अधिकारी
पोलिस दलात काम करत असताना त्यांच्या विशेष कार्याची दखल घेत पोलिस महासंचालक पदक त्याच बरोबर फिक्की यांच्याकडुन विशेष गौरव करण्यात आला आहे.पोलिस दलात उल्लेखनिय कार्याची छाप पाडत असताना वर्दीतील संवेदनशील अधिकारी माञ कधीच लपुन राहिला नाही.पुणे ग्रामीण गुन्हे शाखेतील कार्यालयात येणा-या प्रत्येक नागरिकांना ते आपुलकीचे वागणुक देतात.इतकेच नव्हे काम करत असताना इतर कर्मचा-यांनाही आपल्या हातुन निरापधारांवर अन्याय होता कामा नये याची कटाक्षाने काळजी घेत असतात.

आई वडिल हेच खरे गुरु
पोलिस दलातील त्यांच्या खडतर वाटचालीबद्दल व यशाबद्दल आई व वडील हेच खरे गुरु असुन त्यांच्यामुळेच पोलिस खात्यात चांगल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविण्यात आला असल्याचे पद्माकर घनवट हे आवर्जुन सांगतात.

पोलिस दलात नव्याने येउ इच्छिणा-या नवतरुणांना पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांची यशोगाथा निश्चितच प्रेरणादायी ठरेल....

कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी

वारंवार नापास झालो, पण फौजदार झालोच!

अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!

 

Title: lcb pi padmakar ghanvat success story in department