उदगीर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाची दुचाकी चोरांविरोधात कारवाई...

पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत सात मोटारसायकलींसह 3,78,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

उदगीर (लातूर): पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत सात मोटारसायकलींसह 3,78,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

लातूरमध्ये जिल्हाध्यक्षासह एकाला गांजा आणि मुद्देमालासह अटक...

याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात पोलिस ठाणे स्तरावरील पोलिस पथका कडून जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरी संबंधाने घडलेल्या गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात आली होती. सदर मोहीम अंतर्गत उपविभागीय पोलिस अधिकारी उदगीर शहर डॅनियल बेन यांचे मार्गदर्शन व पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांचे नेतृत्वात उदगीर ग्रामीण पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करून पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना वरिष्ठाकडून वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात येत  होते. 

लातूर पोलिसांची फार्महाऊसवर धाड; लाखो रुपयांचे चंदन जप्त...

सदर पथक पोलिस ठाणे हद्दीतील घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना दिनांक 19/07/2022 रोजी पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक  242/2022 कलम 379 भादवी मधील मोटारसायकल चोरीतील संशयित आरोपी महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगत असलेल्या गावात,परिसरात चोरीच्या मोटरसायकलसह अतिशय कमी किमतीत लोकांना भूल थापा देऊन विक्री करीत आहे. अशी माहिती मिळाल्याने माहितीची शहनिशा व विश्लेषण  करून सदर पथक ग्रामीण भागात माहिती मधील आरोपीच्या शोध घेतले असता  मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित: 1) फारुख रौफ पठाण (वय 23वर्ष, राहणार- जम्मूनगर बिदर गेट जवळ उदगीर), 2) शुभम दत्ता तेलंगे (वय 18, राहणार निळे बंद तालुका उदगीर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी उदगीर तालुक्यातील विविध ठिकाणाहून मोटारसायकल चोरी करून ग्रामीण भागात कमी किमतीत मोटरसायकल विकल्याचे सांगितले. त्यावरून अधिक तपास करून नमूद पथकाने त्याच्याकडून सात मोटरसायकली जप्त केली आहेत. तसेच सदर आरोपीस वर नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.नमूद आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलिस अंमलदार राहुल नागरगोजे हे करीत आहेत.

लातूरमध्ये लाखो रुपयांचा गुटखा जप्त; पाहा १० जणांची नावे...

उदगीर ग्रामीणच्या विशेष पथकाने उत्कृष्टरित्या तपास करून मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल करून 7 मोटार सायकलसह 3 लाख 78 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलिस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांचे नेतृत्वात पोलिस अंमलदार राम बनसोडे, राहुल नागरगोजे, तुळशीराम बरुरे, राहुल गायकवाड, सचिन नाडागुडे यांनी पार पाडली.

लातूर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; खुनाचा उलगडा केला अन्...

लातूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा अन् २० जणांवर गुन्हे दाखल; पाहा नावे...

लातूरमध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यास खंडणी घेताना रंगेहात पकडले...

पुणे पोलिसांनी लातूरपर्यंत पाठलाग करून केली बाळाची सुखरूप सुटका...

लातूर पोलिसांच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलकडून मोठी कारवाई

लातूर पोलिसांनी हस्तगत केल्या १९ मोटारसायकली अन्...

लातूरमध्ये पाहायला मिळाला महिला पोलिसाचा रुद्रावतार...

नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?

लातूर-नांदेड रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला अन् एक मोटार दिसली...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

Title: latur crime news udgir police two arrested for two wheelar r
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे