लातूरच्या पोलिस अधीक्षकांनी स्वतःचा मोबाईल नंबर शेअर केला अन्...
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्याचे लातूर जिल्ह्यातून समुळ उच्चाटन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश संपूर्ण लातूर जिल्हा पोलिस दलाला दिलेले आहेत.लातूरः लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याची तक्रार व माहिती देण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी उपलब्ध करून दिलेल्या स्वतःच्या मोबाईल नंबर वर प्राप्त झालेल्या तक्रारीवरून वरून अवघ्या दहा दिवसात अवैध धंद्याविरुद्ध विरुद्ध 27 गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्याचे लातूर जिल्ह्यातून समुळ उच्चाटन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश संपूर्ण लातूर जिल्हा पोलिस दलाला दिलेले आहेत. शिवाय अवैध धंद्याविरुद्ध थेट पोलिस अधीक्षकाकडे तक्रार अथवा अवैध धंद्याची माहिती देण्याकरिता पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी स्वतःचा मोबाईल नंबर उपलब्ध करून दिलेला आहे. सदरच्या मोबाईल वरून प्राप्त होणाऱ्या माहिती व तक्रारीवर कार्यवाही करण्याकरिता विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. सदरचे पथक थेट पोलिस अधीक्षकांना रिपोर्ट करणार आहे.
दिनांक 09/01/2023 ते 19/01/2023 अवघ्या दहा दिवसात सदर मोबाईल नंबर वरून मिळालेल्या माहिती व तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दहा दिवसात 47 लोकाविरुद्ध 27 गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 5 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत आलेला आहे. यामध्ये अवैध दारू विक्री-15, जुगार-09, गांजा विक्री-01, हातभट्टी 01, प्रतिबंधित मांजा विक्री-01 इत्यादी प्रकारच्या अवैद्य धंद्यावर केलेल्या कारवाईचा समावेश आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकाने केली आहे.
पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाद्वारे जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कठोर कार्यवाही करण्याची मोहीम यानंतरही चालू राहणार आहे. पोलिस अधीक्षकांनी उपलब्ध करून दिलेला मोबाईल क्रमांक 8275000778 यावर नागरिक अवैध धंद्याविरुद्धची माहिती अथवा तक्रार मेसेज किंवा व्हाट्सअप करून देऊ शकतात. तक्रारकर्त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी अवैध धंद्याविरुद्धची माहिती निर्भयपणे मेसेज अथवा व्हाट्सअप द्वारे द्यावी. पोलिस तात्काळ घटनास्थळी जाऊन तक्रारीची खातरजमा करून गुन्हेगाराविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.
पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...
'पोलिसकाका विशेषांक'
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616
अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com
लातूर पोलिसांनी आरोपींकडून लाखो रुपयांचे दागिने केले हस्तगत...
लातूर जिल्ह्यात मध्यरात्री पोलिसांनी राबविले कोंबिग ऑपरेशन...
लातूरमधील युवक मौज-मजेसाठी पुणे शहरात चोरायचा महागडया दुचाकी...
मोठी कारवाई! लातूर जिल्ह्यात लाखो रुपयांचा गुटखा जप्त...
लातूर जिल्ह्यात तब्बर १२ वर्षानंतर मोक्कातंर्गत कारवाई; पाहा आरोपींची नावे...
लातूर पोलिसांची जुगार अड्यावर धाड; पाहा २० जणांची नावे...
लातूर पोलिसांनी पाठलाग करून पकडले अन् १३ मोटारसायकली जप्त...
लातूर पोलिसांनी वाहनाच्या पाठीमागे जाऊन पाहणी केली अन्...
उदगीर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाची दुचाकी चोरांविरोधात कारवाई...
लातूरमध्ये जिल्हाध्यक्षासह एकाला गांजा आणि मुद्देमालासह अटक...
लातूर पोलिसांची फार्महाऊसवर धाड; लाखो रुपयांचे चंदन जप्त...
लातूरमध्ये लाखो रुपयांचा गुटखा जप्त; पाहा १० जणांची नावे...
लातूर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; खुनाचा उलगडा केला अन्...
लातूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा अन् २० जणांवर गुन्हे दाखल; पाहा नावे...
लातूरमध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यास खंडणी घेताना रंगेहात पकडले...
पुणे पोलिसांनी लातूरपर्यंत पाठलाग करून केली बाळाची सुखरूप सुटका...
लातूर पोलिसांच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलकडून मोठी कारवाई
लातूर पोलिसांनी हस्तगत केल्या १९ मोटारसायकली अन्...
लातूरमध्ये पाहायला मिळाला महिला पोलिसाचा रुद्रावतार...
नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?
लातूर-नांदेड रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला अन् एक मोटार दिसली...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.