लातूर पोलिसांनी हस्तगत केल्या १९ मोटारसायकली अन्...

पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या चोरीचे गुन्ह्याचे विशेषत: मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता निर्देशित केले होते.

लातूरः लातूर पोलिसांनी चोरीच्या 19 मोटरसायकलींसह एका आरोपी अटक केली असून, तीन लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

लातूरमध्ये पाहायला मिळाला महिला पोलिसाचा रुद्रावतार...

या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या चोरीचे गुन्ह्याचे विशेषत: मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलिस  अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे,परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनात पोलिस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथील पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान पोलिस स्टेशन विवेकानंद चौक लातूर येथे 28/ 03/2022 रोजी एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

लातूरमध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांना टाकला छापा अन्...

सदर गुन्ह्याचे तपासकामी वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदर पथक रवाना करून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अखिल महबूब शेख (वय 34 वर्षे, राहणार हबीबपुरा परळी जिल्हा बीड, सध्या राहणार शाम, नगर लातूर) यास श्याम नगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी एम.आय.टी कॉलेज पार्किंगमध्ये लावलेली स्प्लेंडर मोटर सायकल चोरी केल्याचे कबूल केले. नमूद आरोपीकडे आणखीन सखोल तपास केला असता त्यांनी लातूर शहर, उदगीर, माळाकोळी, अंबाजोगाई, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, शिक्रापूर, पुणे येथील विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याचे सांगून त्यांने चोरलेल्या मोटारसायकली पैकी 19 मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. अधिक तपास पोलिस करीत आहेत. नमूद आरोपीस पोलिस ठाणे विवेकानंद चौक येथे दाखल असलेले गुन्हा रजिस्टर क्रमांक 189/ 2022 कलम 379 भादवी मध्ये दिनांक 02/04/2022 रोजी अटक करण्यात आली आहे. 

शेतात ऊसतोड करताना महिलेची कपडे पाहून उडाली खळबळ...

सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलिस ठाणे विवेकानंद चौक येथील पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलिस  ठाणे विवेकानंद चौक व उपविभाग लातूर शहर येथील विशेष पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे, पोलिस उपनिरीक्षक महेश गलगट्टे, पोलिस उपनिरीक्षक जिलानी मानूला, पोलिस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, सहायक फौजदार बुड्डे पाटील, वाहिद शेख, रामचंद्र ढगे, पोलिस अमलदार मुन्ना पठाण, संजय कांबळे, रामलिंग शिंदे, दयानंद सारोळे, महेश पारडे, विनोद चलवाड, खंडू कलकत्ते, रमेश नामदास यांचा समावेश होता.

लातूर-नांदेड रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला अन् एक मोटार दिसली...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: latur crime news police seized 19 bike and one arrested for
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे