लातूर पोलिसांची फार्महाऊसवर धाड; लाखो रुपयांचे चंदन जप्त...
चंदनाच्या झाडांची अवैध तोड करून साठा करून ठेवलेल्या फार्महाऊसवर पोलिसांनी कारवाई केली असून, 62 लाखांचा जवळपास 2 टन चंदनाचा मुद्देमाल जप्त केला आहे.लातूरः चंदनाच्या झाडांची अवैध तोड करून साठा करून ठेवलेल्या फार्महाऊसवर पोलिसांनी कारवाई केली असून, 62 लाखांचा जवळपास 2 टन चंदनाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांची ही कारवाई केली आहे.
लातूरमध्ये लाखो रुपयांचा गुटखा जप्त; पाहा १० जणांची नावे...
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व ठाणे प्रमुखांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात 17/06/2022 रोजी सकाळी 0700 वा. सुमारास निकेतन कदम, सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग चाकुर यांना गुप्त माहिती मिळाली की, येरोळ मोडवरुन कबनसांगवी मार्गे एक सिल्व्हर रंगाचे मारूती सुझुकी अल्टो गाडीमधून प्रतिबंधीत व संरक्षित चंदन वृक्षाची लाकुड चोरी करुन चोरटी विक्री करण्यासाठी घेवुन जात आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी पोलिस निरीक्षक बाळकृष्ण मोहिते यांचे नेतृत्वात पोलिस स्टेशन चाकूर येथील अधिकारी व कर्मचार्यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन व सूचना देऊन रवाना केले.
लातूर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; खुनाचा उलगडा केला अन्...
सदर पथकाने नमूद ठिकाणी सापळा लावला तेव्हा सकाळी 08.30 वा. सुमारास मौजे कबनसांगवी जवळ एक सिल्व्हर रंगाची अल्टो गाडी क्र. MH-12 JC-3935 ही येत असल्याची दिसली. पथकाने सदर गाडीस थांबवण्याचा इशारा केला असता ती गाडी न थांबवता पुढे निघून गेली. सदरची गाडी थोड्या अंतरावर थांबण्यास भाग पाडुन सदर गाडीतील इसमास गाडी खाली उतरवुन गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये 11 बॅग चंदन दिसुन आले. साईनाथ अश्रृबा पुट्टे (वय 43 वर्षे, रा. सताळा ता उदगीर जि. लातुर) याने वेगवेगळ्या ठिकाणाहुन आलेला माल तो त्याचे शेतातील आखाड्यावर मौजे सताळा शिवार ता उदगीर जि लातुर येथे ठेवत असल्याची माहिती दिली. संबंधित फार्महाऊसवर गेले असता साईनाथ पुट्टे यांचे आखाड्याचे शेडचे पाठीमागील बाजूस अशोक लिलँड ट्रक मध्ये दोन इसम चंदनाच्या धपल्या व लाकडे भरत असल्याचे दिसले. त्यांच्याकडे विचारपूस करून साईनाथ पुट्टे यांचे शेडचे समोरील उकंड्याचे बाजुस असलेल्या हौदात उतरुन पाहणी केली असता त्यात चंदनाचे लाकडे व धपल्या असलेल्या बॅग मिळून आल्या.
लातूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा अन् २० जणांवर गुन्हे दाखल; पाहा नावे...
वरील कारवाई मध्ये जवळपास 2 टन चंदन (1957 kg) अंदाजे किंमत ४० लाख आणि इतर असे एकूण ६२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चाकूर पोलिस स्टेशनचे पोलिस अमलदार पाराजी गंगाधर पुठ्ठेवाड यांचे फिर्यादीवरून पोलिस स्टेशन चाकूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 224/2022 कलम 379, 34 भादवी, कलम 41 42 भारतीय वन अधिनियम 1927 व कलम 04 महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम प्रमाणे आरोपी 1) साईनाथ अश्रृबा पुट्टे (पत्ता: सताळा ता उदगीर, लातूर), 2) लतीफ अहमद कुट्टी (पत्ता: केरळ), 3) गिरीशकुमार वेल्लुतिरी (पत्ता: केरळ) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील चंदनाचे मुद्देमाल कुठे वाहतूक केला जातो. त्याबद्दल अधिक तपास करण्यात येत आहे.
लातूरमध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यास खंडणी घेताना रंगेहात पकडले...
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस अधिक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वात पोलिस निरीक्षक बालाजी मोहिते, पोलिस अमलदार साहेबराव हाके,सूर्यकांत कलम, पिराजी पुट्टेवाड, बाळू अरदवाड, रायभोले आणि रितेश अंधोरिकर यांनी केली आहे.
पुणे पोलिसांनी लातूरपर्यंत पाठलाग करून केली बाळाची सुखरूप सुटका...
लातूर पोलिसांच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलकडून मोठी कारवाई
लातूर पोलिसांनी हस्तगत केल्या १९ मोटारसायकली अन्...
लातूरमध्ये पाहायला मिळाला महिला पोलिसाचा रुद्रावतार...
नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?
लातूर-नांदेड रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला अन् एक मोटार दिसली...