लातूरमध्ये जिल्हाध्यक्षासह एकाला गांजा आणि मुद्देमालासह अटक...

अखिल भारतीय अकाली सेना संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह एकाला प्रतिबंधित गांजासह 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमालसह अटक करण्यात आली आहे.

लातूरः अखिल भारतीय अकाली सेना संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह एकाला प्रतिबंधित गांजासह 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमालसह अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

लातूर पोलिसांची फार्महाऊसवर धाड; लाखो रुपयांचे चंदन जप्त...

पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार कॉईल नगर, लातूर परिसरामधील काही इसम प्रतिबंधित गांजाची बेकायदेशीरपणे विक्री व्यवसाय करीत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहनिशा करून सहाय्यक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांचे नेतृत्वात शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दयानंद पाटील यांनी पोलिस पथकातील अधिकारी व अंमलदारांसह गोपनीय माहिती प्रमाणे कॉइल नगर मधील एका घरावर छापा मारला. 

लातूरमध्ये लाखो रुपयांचा गुटखा जप्त; पाहा १० जणांची नावे...

विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गांजा बाळगलेले व्यक्ती आढळून आले. त्यांच्याकडून 155 ग्रॅम गांजा तसेच रोख रक्कम 3 लाख 9 हजार 350 रुपये इतकी रक्कम मिळून आली. नमूद रक्कम व गांजा जप्त करण्यात आला असुन सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत कुदळे यांचे फिर्याद वरून पोलिस ठाणे शिवाजीनगर येथे प्रतिबंधित गांजाची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारे 1)शरीफ लतीफ शेख (वय 34, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय अकाली सेना, राहणार कॉइल नगर लातूर), 2) गणेश विभीषण बनसोडे (वय 19 धंदा मजुरी, राहणार कॉइल नगर लातूर) यांच्यावर पोलिस ठाणे शिवाजीनगर येथे कलम 20 (ब)(क) गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर  गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

लातूर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; खुनाचा उलगडा केला अन्...

लातूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा अन् २० जणांवर गुन्हे दाखल; पाहा नावे...

लातूरमध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यास खंडणी घेताना रंगेहात पकडले...

पुणे पोलिसांनी लातूरपर्यंत पाठलाग करून केली बाळाची सुखरूप सुटका...

लातूर पोलिसांच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलकडून मोठी कारवाई

लातूर पोलिसांनी हस्तगत केल्या १९ मोटारसायकली अन्...

लातूरमध्ये पाहायला मिळाला महिला पोलिसाचा रुद्रावतार...

नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?

लातूर-नांदेड रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला अन् एक मोटार दिसली...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

Title: latur crime news police officer niketan kadam action and two
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे