पुण्यातील व्यापाऱयाला लातूरमध्ये लुटले; पण १२ तासातच...

पुणे येथील एक व्यापारी शुक्रवारी(ता. १९) व्यवसायाच्या निमित्ताने लातूर शहरात आले होते.

लातूरः शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरीतील आरोपीस 12 तासाचे आत अटक करण्यात पोलिसाना यश आले आहे. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

बाल लैगिंक अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी...

याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, पुणे येथील एक व्यापारी शुक्रवारी(ता. १९) व्यवसायाच्या निमित्ताने लातूर शहरात आले होते. त्यांनी त्यांचे पाठीवर सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग अडकवून व्यापार करून परत ते राहत असलेल्या लॉज कडे पायी चालत जात होते. त्यांच्यावर पाळत ठेवून रात्री 08:30 वाजण्याच्या सुमारास एका कापड दुकानाजवळ, रोडवर फिर्यादीचे पाठीवर असलेली दागिन्याची व रोख रकमेची बॅग अनोळखी व्यक्तीने त्यांच्याजवळ असलेल्या बंदुकीसारख्या हत्याराचा धाक दाखवून फिर्यादी जवळील सोन्याची दागिन्याची व रोख रक्कम असा एकूण 05 लाख 48 हजार 240 रुपये ची बॅग हिसकावून घेऊन मोटार सायकल वर बसून पळून गेले होते. तक्रारदाराच्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशन गांधी चौक येथे कलम 394 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल होऊन सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक वेंकट कवाडे हे करीत होते.

धक्कादायक! पुण्यात फेसबुक लाईव्ह करत वेटरची आत्महत्या...

धक्कादायक! तथाकथित महाराजाच्या मठावर टाकला छापा अन्...

सदर गुन्ह्याचे घटनास्थळी पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी भेट दिली. व वरिष्ठांचे आदेशान्वये जितेंद्र जगदाळे  यांनी त्यांचे विशेष पथकातील पोलिस अंमलदारांना तपासाचे अनुषंगाने सूचना देऊन शहरात रवाना केले. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना विशेष शाखेतील सहाय्यक फौजदार वहीद शेख, रामचंद्र ढगे, पोलिस अंमलदार महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अमलदार खुर्रम काझी, रवी गोंदकर, यशपाल कांबळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपी 1) रामेश्वर उर्फ पाप्या सूर्यकांत बजगुडे (रा. जुना औसा रोड लातूर) व एक विधीसंघर्षित बालक अशांना निष्पन्न करून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्याच्या संबंधाने विचारपूस करून 12 तासाच्या आत आरोपींना अटक केली.

पिकअपचा दरवाजा उघडा दिसला अन् धक्काच बसला...

गुन्ह्यात चोरलेली रक्कम व सोन्याचे दागिने असा 05 लाख 48 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल व पिस्टल सारखा दिसणारा हत्यार जप्त केला आहे. विशेष पथकातील पोलिसांनी 48 तासांच्या आत जप्त गुन्ह्यातील 100% मुद्देमाल  हस्तगत केला आहे. आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने  एका आरोपीस पोलिस कस्टडी सुनावली आहे.

एटीएम लुटणाऱयांना एलसीबीकडून मोठ्या शिताफीने अटक

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांचे नेतृत्वात विशेष शाखेतील सहाय्यक फौजदार वहीद शेख, रामचंद्र ढगे, पोलिस अंमलदार महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के, तसेच स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील पोलिस अमलदार खुर्रम काझी, रवी गोंदकर यशपाल कांबळे, पोलिस ठाणे गांधी चौक येथील पोलिस अमलदार दामोदर मुळे व शिंदे यांनी पार पाडली.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: latur crime news police arrested for pune gold merchant robb
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे