लातूर पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केल्या दुचाकी; पाहा नंबर...

लातूर स्थानिक गुन्हे शाखाने केलेल्या कारवाईत मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

लातूरः स्थानिक गुन्हे शाखाने केलेल्या कारवाईत मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. एकूण आठ मोटार सायकलींसह एकूण 2,60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील महिला पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या...

सविस्तर वृत्त असे की, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यात करिता आदेश निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात लातूर जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरी संबंधाने घडलेल्या गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा चे अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील तिघांनी मृत्यूला कवटाळले...

सदर मोहीम अंतर्गत पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. सदर पथक जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पोलिस ठाणे विवेकानंद येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीतील संशयित आरोपी गरुड चौक, नांदेड नाका परिसरात त्याने चोरलेले मोटरसायकल विकण्याच्या प्रयत्नात परिसरात फिरत आहे. अशी माहिती मिळाल्याने सदर पथकाने गरुड चौक, नांदेड नाका परिसरात सापळा लावला. माहितीप्रमाणे मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित 1) साहिल रज्‍जाक शेख, (वय 17 वर्ष, राहणार- धानोरा ता. अंबाजोगाई जि. बीड. ह.मु. बुरहान नगर, लातूर) यास पथकाने विश्वासात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली. त्याने त्याचा आणखी एक साथीदार याच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटरसायकली चोरल्या असून, त्यापैकी 02 मोटारसायकली माझ्या घरा समोर लावलेल्या आहेत असे सांगितले. साहिल शेख याने सांगितल्याप्रमाणे सदरचे पथक शिरूर अनंतपाळ येथे गेले असता तेथे 06 मोटरसायकली मिळून आल्या. त्या सर्व चोरीच्या असल्याचे साहिल शेख यांनी सांगितले. सदरच्या सर्व मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून, जप्त केलेल्या मोटर सायकलची माहिती खालील प्रमाणे.

करुणा शर्मा यांच्या गाडीजवळ स्कार्फ बांधून आलेली महिला कोण?

1) Honda Shine (black colour)
   Chasers number
   MP4JC652DEF701888
   Engine number
   JC65E70057210

2) TVS sport (black colour)
Chasis number
MD625MF55166277
Engine number
CF5FA1465059

3) TVS Victor (gold colour)
Chasis number
IV3210M268927
Engine number
N3210F266669

4) Hero Passion Pro ( black colour)
Chasis number
07K03C31992 
Engine number
02K05E05M12119

5) Hero HF deluxe (black colour)
Chassis number
MBLHA11EVD9J02499
Engine number
HA119J51145

6) Hero Honda Splendor (black colour)
Chassis number
05D16F05659
Engine number
05D15E05807

7) Hero Honda CD Deluxe (black colour)
Chassis number
MBLHA11CD8908711
Engine number
HA11EA89J05155

8) Hero Honda CD dawn(black colour)
Chasis number
05C27E39823
Engine number
05C27E36532

अनिल देशमुख यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी...

पोलिसांनी एकूण 2 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल एकूण 8 मोटारसायकली जप्त केला आहे. सदर चोरीच्या मोटार सायकलची पडताळणी केली असता पोलिस ठाणे विवेकानंद चौक, लातूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 266/2021 कलम 379 भादवी व गुन्हा रजिस्टर क्रमांक 349/2021 कलम 379 भादवी. प्रमाणे गुन्हे दाखल असल्याने जप्त मोटारसायकली व विधी संघर्ष बालक नामे साहिल शेख यास पुढील कार्यवाही व तपास करिता पोलिस ठाणे विवेकानंद चौक यांचेकडे देण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास विवेकानंद पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व अंमलदार करत आहेत.

बापरे! युवतीला व्हॉटसॅपग्रुप पाहिल्यानंतर धक्काच बसला...

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, पोलिस उपअधीक्षक (गृह) प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक सूर्यवंशी पोलिस अंमलदार- अंगद कोतवाड, माधव बिल्लापट्टे, राजू मस्के, सदानंद योगी, मोहन सुरवसे, नकुल पाटील यांनी बजावली.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: latur crime news lcb recover two wheeler vehicle and arreste
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे